सामाजिक
दिपाली पुराणिक यांना राज्यस्तरीय महिला शिक्षकभूषण पुरस्कार
सरपंच सेवा संघाचा महिला शिक्षक भुषण पुरस्कार राज्याध्यक्ष भाऊ मरगळे, सरचिटणीस बाबासाहेब पावसे यांच्या हस्ते स्वीकारताना दिपाली पुराणिक समवेत उदयोन्मुख अभिनेत्री भार्गवी पुराणिक, राजेंद्र पुराणिक आदी.
आरडगाव प्रतिनिधी/राजेंद्र आढाव : नेवासा तालुक्यातील शिरेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या गुणवंत शिक्षीका दिपाली पुराणिक यांना ग्रामीण भागात केलेल्या शैक्षणिक कार्याबद्दल सरपंच सेवा संघाचा राज्यस्तरीय महिला शिक्षकभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कोल्हापूर येथे ‘ मान नेतृत्वाचा सन्मान कर्तृत्वाचा ‘ राज्यस्तरीय सरपंच सेवा संघाचा सन २०२१ चा महिला शिक्षकभूषण पुरस्कार संस्थापक अध्यक्ष यादवराव पावसे व राज्याध्यक्ष भाऊसाहेब मरगळे यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
सौ.पुराणिक यांनी ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणासाठी वाड्या वस्त्यावर फिरून विद्यार्थी व पालकांना आँनलाईन शिक्षणाचे महत्व पटवुन देणे, आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थांना समाज माध्यामातून मदतीचा हात मिळवुन देऊन शिक्षणाची ओढ निर्माण केली आहे. सरपंच सेवा संघातर्फे राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक, कला, शिक्षण, राजकिय, उद्योग, वैद्यकिय क्षेत्रातील काम करणाऱ्या व्यक्तींचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव केला जातो.
या प्रसंगी सरपंच सेवा संघाचे राज्याध्यक्ष भाऊ मरगळे म्हणाले, ग्रामीण भागात शिक्षण क्षेत्रात काम करताना महिला शिक्षीका भगिनी अनेक अडचणीचा सामना करत ज्ञानदानाचे काम करत असतात. कामात सातत्य ठेवत गुणवंत विद्यार्थी घडवण्यासाठी सध्या कोरोनाच्या काळात ऑनलाईन शिक्षणासाठी गरीब गरजू विद्यार्थांना समाजमाध्यामातून मदतीचा हात देण्यात पुढाकार घेणाऱ्या दिपाली पुराणिक यांना राज्यस्तरीय महिला शिक्षकभूषण पुरस्कार प्रदान करताना मनस्वी आनंद होत आहे.
यावेळी सरपंच सेवा संघाच्या महिला अध्यक्षा प्रमिला एखंडे, उपाध्यक्षा वर्षा गिरी, राज्य सरचिटणीस बाबासाहेब पावसे, जयदिप वानखेडे, उदयोन्मुख अभिनेत्री भार्गवी पुराणिक, राजेंद्र पुराणिक आदींच्या उपस्थीतीत संपन्न झाला.