घराचे माळद कोसळून आजोबासह नातींचा मृत्यू…
◾पैठण तालुक्यातील घारेगाव येथील दुर्दैवी घटना
विजय चिडे/पाचोड : पैठण तालुक्यातील घारेगाव येथे शुक्रवारी रात्री झालेल्या जोरदार पावसाने घराचे माळद कोसळून एका साठ वर्षीय आजोबा सोबत तेरा वर्षीय नातींच्या अंगावर पडल्याने माळदाच्या ढिगाऱ्या खाली दबून या दोघांना जागीच मृत्यू झाल्याची घटना रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून जगदिश विठ्ठल थोरे(वय-६०) व वेदिका ज्ञानेश्वर थोरे (वय१३) असे मृत आजोबा व नातीचे नाव आहे.
अधिक माहीती अशी की, पैठण तालुक्यात गेल्या दहा बारा दिवसापासून वरुणराजा जोरदार हजेरी लावत आहे. असाच काहीसा प्रकार घारेगाव येथे शुक्रवारी मध्य रात्री घडला. तब्बल तीन-चार तास पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामूळे परिसरात सर्वत्र पूर स्थिती निर्माण झालेली असल्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. हा पाऊस जोरदार सुरू असल्याने थोरे कुंटुंब सायंकाळी साडेपाच ते सहा वाजेच्या सुमारास स्वंपयाक करुन जेवण वैगरे करून आठच्या दरम्यान झोपी गेले असता याच दरम्यान जोरदार पावसामुळे घरावरील माळद खचली आणि घरातील पाच सदस्यांच्या अंगावर पडले. यामध्ये तीन जणं सुखरूप वाचवण्यात गावकऱ्यांना यश आले. मात्र जगदिश थोरे व वेदिका थोरे हे दोघेजण पडलेल्या माळदाच्या ढिगाऱ्या खाली दबल्या गेल्या होते.
या घटनेची माहिती रात्री आजुबाजूच्या लोकांना कळताच त्यांनी तात्काळ एका जेसीबी चालकांस संपर्क साधून या माळदाच्या ढिगाऱ्या दबलेल्या पाचही जणांना बाहेर काढून एका खाजगी वाहनाव्दारे तातडीने आडूळ येथील आरोग्य केद्रांत उपचारासाठी दाखल केले. दरम्यान या घटनेची माहिती रूग्णवाहीकेला दिली असता रूग्णवाहिका वेळेवर आली नाही तसेच रात्री या आरोग्य केद्रांत वेळेवर डाँक्टराकडून त्यांना योग्य उपचार न भेटल्याने जगदिश थोरे व वेदिका थोरे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. उपचारासाठी दाखल केल्यानंतर काही वेळाने डॉक्टरांनी उपचारा दरम्यान हे मृत झाल्याचे घोषित केले.
या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरली असून पाचोड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सुरेश माळी, बिट जमादार जगन्नाथ उबाळे, हनुमान धन्वे यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा करत, या घटनेची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोड पोलिस करत आहे.