शिक्षणवारी ज्ञान पंढरी

सात्रळ महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता निर्धारण कक्ष आयोजित राष्ट्रीय स्तर कार्यशाळा संपन्न

चिंचोली प्रतिनिधी – पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सात्रळ येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता निर्धारण कक्ष (आय.क्यु.ए.सी.) आयोजित नॅक मूल्यांकन आणि प्रत्यारोपण संदर्भातील अद्यावत दिशानिर्देशानुसार दोन दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. या कार्यशाळेत सात्रळ महाविद्यालय तसेच संस्थेच्या विविध महाविद्यालयातील प्राध्यापकासह ४७१ अभ्यासकांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभाग नोंदवला.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या प्रा. जयश्री सिनगर उपस्थित होत्या. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे व पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पा. यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो. डॉ. सोमनाथ घोलप, उपप्राचार्य प्रा. दिपक घोलप, कार्यालयीन अधिक्षक विलास शिंदे, महेंद्र तांबे, प्रा. निलेश कान्हे, प्रा. हरी दिवेकर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

उद्घाटनपर बीज भाषणात केंद्रीय विद्यापीठ पंजाब (भटींडा) येथील इंग्रजी विषयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. विपिन पाल सिंग म्हणाले, नॅक मूल्यांकन करताना आपणास महाविद्यालयाच्या ऑनलाईन नोंदणीपासून सुरुवात करावी लागते. महाविद्यालयातील अध्ययन, अध्यापन आणि संशोधन प्रक्रियेतील गुणात्मक वाढ आणि विकास यांचे यानिमित्ताने मूल्यमापन होत असते. नॅक मूल्यांकनामुळे महाविद्यालयांची गुणवत्ता निश्चितपणे वाढलेली आहे. गुणवत्ता वाढीसाठी महाविद्यालयांनी नॅक व्दारे मूल्यांकन करणे आवश्यक आहे.

पहिल्या सत्रात मार्गदर्शन करताना धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर ( ता. येवला ) येथील सहयोगी प्राध्यापक आणि इंग्रजी विभागप्रमुख डॉ. जगदीश पाटील म्हणाले, महाविद्यालयाने नियमितपणे प्रत्येक कामाचे प्रलेखन करणे आवश्यक आहे. नॅक मुल्यांकनामुळे उच्च शिक्षण क्षेत्रात झपाट्याने प्रगती होत आहे. आज माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येतो आहे. नॅकची मूल्यांकनाची बदलेली प्रक्रिया विद्यार्थी केंद्रीभूत असून यात आता सुगमता आली आहे.

दुसऱ्या सत्रात चोपडा महाविद्यालयाचे प्रा. दीनानाथ पाटील म्हणाले, महाविद्यालयाने प्रथम वार्षिक नियोजन प्रारूप तयार करून त्यानुसार आपले दैनंदिन काम करावे. महाविद्यालयामध्ये गुणात्मक आणि संख्यात्मक उपक्रमांची वाढ केल्यास आपणास अपेक्षित असणारी श्रेणी निश्चित मिळवता येते. विविध नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रम आपणास ग्रेड मिळवण्यासाठी मदत करतात.

तिसऱ्या सत्रात डॉ. बाबासाहेब सलालकर म्हणाले, महाविद्यालयाच्या प्रत्येक उपक्रमांमध्ये आयसीटीचा जास्तीत जास्त वापर करावा. पेपरलेस ॲक्टिव्हिटी जास्त गुण मिळण्यास उपयुक्त आहेत. वेबसाइट हा महाविद्यालयाचा आरसा असतो,ती नेहमी अपडेट असावी. उत्कृष्ट शोधनिबंध गुणवत्तापूर्ण असणाऱ्या संशोधन नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो.

चौथ्या सत्रात नॅक मानका संदर्भातील सात निकषानुसार डॉ. विजय पुलाटे, डॉ. भाऊसाहेब नवले, डॉ. अनंत केदारे, डॉ. अमित वाघमारे, डॉ. नवनाथ शिंदे, डॉ. नितीनकुमार पाटील, प्रा. दिनकर घाणे यांनी सादरीकरण केले.

प्रास्ताविक महाविद्यालय अंतर्गत गुणवत्ता निर्धारण कक्ष (आय.क्यु.ए.सी.) प्रमुख प्रा. सोमनाथ बोरुडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. नंदकुमार भंडारी व प्रा. दीप्ती आगरकर यांनी केले. तर आभार प्रा. छाया कारले यांनी मानले.

Related Articles

Back to top button