महाराष्ट्र

कारभारी फापाळे यांची महाराष्ट्र भुषण आदर्श कारागीर पुरस्कारासाठी निवड

संगमनेर/ शहर : फापाळे ग्लास व अल्युमिनियम वर्क्स चे मालक कारभारी दगडू फापाळे यांना समता साहित्य अकादमी यवतमाळ यांचा २०२१ चा महाराष्ट्र भुषण आदर्श कारागीर पुरस्कारासाठी निवड झाली आहे. जनसंपर्क अधिकारी बाबासाहेब मेमाणे साहेब यांच्या हस्ते त्यांचा आज सत्कार करण्यात आला.
फापाळे यांनी शून्यातून त्यांचा उद्योग उभा करून विविध राज्यात अनेक मोठी कामे उत्कृष्ट रीतीने पार पाडली आहे. आज या कामाची दखल घेत येत्या २४ सप्टेंबर २०२१ रोजी नागपूर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. उद्योजक रवी डूबे, इंजि आशिष कानवडे, गणेश फरगडे, सावरचोळचे माजी ग्रा. पं. सदस्य सागर कानवडे, संपत कानवडे, अनिकेत शेटे यांनी फापाळे यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहे.

Related Articles

Back to top button