छत्रपती संभाजीनगर

पाचोडमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा

विजय चिडे/ पाचोड : येथिल शिवछत्रपती कला महाविद्यालयांत मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला आहे. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, पाचोडचे सरपंच शिवराज भुमरे यांच्या हस्ते सकाळी ७ वाजता ध्वजारोहण करण्यात आले.

या प्रंसगी शिक्षकेत्तर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी उपस्थित होते. दरम्यान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एम. नलावडे यांनी १७ सप्टेंबर मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्त विद्यार्थ्यांना संबोधित केले व मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस का साजरा केला जातो याचा थोडक्यात इतिहास सांगितला. तसेच इतिहास विभाग प्रमुख डॉ. जायभाये यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन करून त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.

यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी व स्वयंसेवक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी महाविद्यालयात साफसफाई व वृक्ष छटाई केली.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button