महाराष्ट्र
स्वराज्यसंकल्पभूमी पेमगिरीत जागर इतिहासाचा…!
संगमनेर/बाळासाहेब भोर : ऐतिहासिक व नैसर्गिक वैभवप्राप्त स्वराज्यसंकल्पभूमी पेमगिरीत पानिपतकार विश्वास पाटील व इतिहास संशोधक डॉ. संतोष खेडलेकर सर यांनी भेट दिली.
यावेळी त्यांनी शहागड, महावटवृक्ष, सातवाहनकालीन बारव, सागवानी भव्य हनुमान मंदिराला भेट दिली. याप्रसंगी पेमगिरीकरांना मार्गदर्शन करताना त्यांनी पेमगिरीच्या इतिहासातील पाऊलखुणांना उजाळा दिला. ऐतिहासिक व नैसर्गिक वारसा लाभलेल्या पेमगिरीचा जाज्वल्य इतिहास ऐकून नागरिकही भारावून गेले.
या कार्यक्रम प्रसंगी देविदास गोरे सर, सह्याद्री कॉलेजचे प्राचार्य गवांदे सर, शेजवळ सर, माजी पंचायत समिती सदस्य रावसाहेब काका डुबे, पेमगिरीचे माजी सरपंच सन्मा. सोमनाथ गोडसे साहेब, शॅप्रोचे संचालक शांताराम डुबे, भानुदास कोल्हे साहेब, विष्णु डुबे, पोलीस पाटील मिलिंद टपाल, दीपक गपले, उपक्रमशील शिक्षक अशोक शेटे, वृक्षमित्र स्वप्नील कोल्हे व ग्रामस्थ उपस्थित होते.