सामाजिक
मुद्गुले सर्वसामान्यांसाठी उपलब्ध असणारे व्यक्तिमत्व : प्रकाश चित्ते
श्रीरामपूर[बाबासाहेब चेडे] : श्रीरामपूर तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन गणेशराव मुद्गुले हे २४ तास उपलब्ध असणारे व सर्वसामान्यांसाठी सर्व कामात सहकार्य करणारे व्यक्तिमत्व असल्याचे प्रतिपादन भाजपचे जिल्हा नेते प्रकाशअण्णा चित्ते यांनी हॉटेल गीतगंगा शिरसगाव सभागृहात झालेल्या माजी पंचायत समिती सदस्य गणेशराव मुद्गुले यांच्या अभिष्टचिंतन समारंभात केले.
शिरसगाव सोसायटी माजी चेअरमन बापूराव काळे हे अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी बापूराव काळे यांच्या हस्ते गणपतीची पूजा व आरती घेण्यात आली. यावेळी गणेशराव मित्र मंडळाच्यावतीने व स्नेहीनी पुष्पहार बुके देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. वाढदिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, प.स.नाना शिंदे, उपसभापती राजेंद्र तोरणे, माजी प.स.सदस्य किशोर पाटील, सोसायटी चेअरमन साईनाथ गवारे, शंकरराव मुठे, भिमभाऊ बांद्रे, बेलापूर सरपंच महेंद्र साळवी, युवक कार्यकर्ते गणेश भाकरे आदी उपस्थित होते. प्रकाश चित्ते पुढे म्हणाले की मुद्गुले हे जनसामान्यासाठी २४ तास उपलब्ध असतात व कोणत्याही कामात मदत करीत असतात. फोन आला की ५ मिनिटात हजर होतात. गणेशराव यांचा जनसंपर्क हसतमुख चेहरा, कमी बोलणे, स्मितहास्य या सर्व गुणांमुळे सर्व मित्र परिवार शिरसगाव, श्रीरामपूर परिसरात आहे. आपल्या सामाजिक राजकीय जीवनात आपल्या कामकाजातून अनेक लोक जोडण्याचे काम त्यांनी केले. आर्थिकदृष्ट्या, कौटुंबिकदृष्ट्या त्यांची प्रगती पाहिजे तशी झाली नसेल, परंतु त्यांनी ही मोठी जनतारूपी लक्ष्मी कमावली त्याची किंमत कोणी करू शकत नाही. या पुढील काळात सुद्धा जनता त्यांचे पाठीशी उभी राहील व आम्ही सुद्धा खंबीरपणे उभे राहू असे मनोगत प्रकाशअण्णा चित्ते यांनी व्यक्त केले. सूत्र संचालन नितीन गवारे यांनी व आभार प्रदर्शन दत्ता जाधव यांनी केले.