राजकीय
राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीसपदी औताडे
श्रीरामपूर[बाबासाहेब चेडे] : तालुक्यातील माळेवाडी येथील प्रगत शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते भागचंद यादवराव औताडे यांची अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या सरचिटणीसपदी कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांनी नियुक्ती केली.
नियुक्तीचे पत्र महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांच्या हस्ते देण्यात आले. औताडे हे अविनाश आदिक यांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी पक्षाचे कार्य सतत करीत असून त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची नियुक्ती झाली आहे. पक्षाचे संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे पुरोगामी विचार व पक्षाची ध्येयधोरणे समाजात रुजवून पक्ष बळकटीचे काम, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम जबाबदारीने पार पाडू असे आश्वासन भागचंद औताडे यांनी दिले.
भागचंद औताडे यांचे श्रीरामपूर नगराध्यक्षा व नूतन साई संस्थान विश्वस्त अनुराधा आदिक, पत्रकार बी आर चेडे, जयकर मगर, रंगनाथ माने, मधुकर म्हसे, मच्छिंद्र जगताप आदींनी केले आहे.