महाराष्ट्र
इपीएस 95 पेन्शन धारकांचा सोलापूर येथे जिल्हा मेळावा संपन्न
श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे ) : सोलापूर येथे राष्ट्रीय संघर्ष समितीचे वतीने ईपीएस ९५ पेन्शन धारकांचा जिल्हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यास सोलापूर व परिसरातील पेन्शन धारकांनी उदंड प्रतिसाद दिला एक हजार चे वर पेन्शनर उपस्थित होते.सभागृहात जागा उपलब्ध न झाल्याने अनेक जणांना बाहेर थांबावे लागले.
सभेच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प.लक्ष्मण महाराज चव्हाण होते. प्रमुख मार्गदर्शन करतांना राष्ट्रीय संघटक सचिव सुभाषराव पोखरकर यांनी मा. कमांडर अशोकराव राऊत यांचे नेतृत्वाखाली चालू असलेल्या देशव्यापी आंदोलनाची सविस्तर माहिती देवून उपस्थितांना एकजुटीने राष्ट्रीय संघर्ष समिती व कमांडर साहेबांच्या मागे उभे राहण्याचे आवाहन केले. पंतप्रधानांनी आश्वासन दिलेले असुन त्याची लवकरात लवकर पुर्तता करून घेणेसाठी सर्वांना संघटीत होण्याचे आवाहन केले.
सभेस मराठवाडा अध्यक्ष दादाराव देशमुख, श्रीगोंदा अध्यक्ष भगवंतअप्पा वाळके, अध्यक्ष पवार महाराज यांनी ही मार्गदर्शन केले. सभेस नगर जिल्हाध्यक्ष संपतराव समिंदर, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष थोरात व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. सोलापूर जिल्हाध्यक्ष महादेवबापु आतकरे यांनी सर्वांचे स्वागत केले.
जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा वैशालीताई बनसोडे, जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते व विविध विभागांचे पेन्शनर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळावा यशस्वितेसाठी सिद्धेश्वर मोटे, शशिकांत भुसारे, आदिनाथ शिंदे इत्यादी NAC कार्यकर्त्यानी परिश्रम घेतले.