राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्या हस्ते ३५ शाखेचे उद्घाटन
विलास लाटे/पैठण : तालुक्यातील चितेगाव, फारोळा, बिडकीन आणि पैठण शहरातील विविध भागात जोरदार पावसात राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष महेबुब शेख यांच्या हस्ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या ३५ शाखांचा उद्घाटन सोहळा आणि युवक मेळावा नुकताच पार पडला.
यावेळी युवकांचा प्रचंड उत्साह आणि पक्षनिष्ठा बघून युवक अध्यक्ष भारावून गेले, येणारा काळ हा परिवर्तनाचा असेल, युवक सहकाऱ्यांचा असेल फक्त पक्षाशी प्रामाणिक राहून संघटनेत काम करावे आणि संघटना वाढवावी या संदेशासह जोमाने मरगळ झटकून कामाला लागण्याचा संदेश दिला. तसेच चित्रा वाघ यांचा चांगला समाचार घेत त्यांना सुपारी गँग आणि लाचखोर ( बोक्याची ) नवऱ्याची बायको आहे म्हणून असल्या व्यक्तीच्या वक्तव्याला मी फार महत्व देत नाही असे मेहबूब शेख यांनी सांगितले. पैठण तालुक्याचा चांगला अभ्यास आणि फार पूर्वीपासूनच पैठणशी नात सांगताना तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच आमदार असता पण ! पण ” हमे तो अपनोने लुटा , गैरो मे कहा दम था” , हे देखील अध्यक्ष सांगायला विसरले नाही. याप्रसंगी प्रदेश अध्यक्ष यांच्या हस्ते अर्जुन बेडवाल यांची राष्ट्रवादी युवक जिल्हाप्रसिद्धी प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्ताभाऊ गोर्डे, आयोजक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब तरमळे, तालुकाध्यक्ष अप्पासाहेब निर्मळ यांनी मार्गदर्शन केले व त्यावेळी व्यासपीठावर औरंगाबाद शहर युवक अध्यक्ष दत्ता भांगे, मयुर सोनवणे, जिल्हा सरचिटणीस , मयूर अंधारे , युवक प्रदेश सरचिटणीस प्रमोद भैय्या सरोदे, युवक जिल्हा सरचिटणीस दिनेश पाटेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक पैठण तालुकाध्यक्ष प्रवीण शिंदे, कार्याध्यक्ष आशुतोष नरवडे, उप तालुका अध्यक्ष प्रल्हाद काकडे, युवक पैठण शहराध्यक्ष इरफान बागवान, अल्पसंख्याक पैठण शहराध्यक्ष अफरोज बड्डे, महिला शहराध्यक्ष नीता परदेशी, आप्पासाहेब गायकवाड, भाऊसाहेब पिसे,संजीव कोरडे, कैलास प्रकाश पाटील ढोकणे , कडुबाल नरवडे, बंडू शेळके, जयराम कुटे, शुभम साळवे , अनिल भालेराव , मेहमूद शहा , तमिजोड्डीन इनामदार , अख्तर शेख , रुपेश शिंदे , योगेश शेळके यांच्यासह पैठण शहर व तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे व विविध सेलचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.