छत्रपती संभाजीनगर

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांचा नागरी सत्कार

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्रा.दिनेश पाटेकर हे युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांचा सत्कार करुन संविधानाची प्रत देताना.

विलास लाटे/ पैठण : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख हे पैठण तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांचा बालानगर-आडुळ सर्कलच्या वतीने धनगाव येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्रा.दिनेश पाटेकर यांच्या हस्ते भारतीय संविधानाची प्रत देऊन नागरी सत्कार करण्यात आला .यावेळी महेबूब शेख यांच्या सह राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय गोर्डे, युवकचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब तरमळे व तालुकाध्यक्ष अप्पासाहेब निर्मळ यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी भरपावसात त्यांच्या सत्कारासाठी अतुरलेले कार्यकर्त्यांचे प्रेम बघून महेबूब शेख भारावून गेले. यावेळी तालुक्यामध्ये त्यांच्या हस्ते तब्बल ३५ शाखांचे उद्घाटन करण्यात आले.
सत्काराप्रसंगी संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक गोपीनाना गोर्डे, ग्रा.पं.सदस्य शेख एजाज,ग्रा.पं. सदस्य बद्रीनाथ गोर्डे, ग्रा.पं. सदस्य तथा अल्पसंख्याक तालुका कार्यध्यक्ष आरेफ शेख, बंटी ताकवले, विद्यार्थी तालुका सरचिटणीस ऋषी मुळे,विशाल गोर्डे, पवन गव्हाणे, लक्ष्मण पाटेकर, करण पटेकर, विशाल गल्हाटे, पंडित औसारे, अच्युत गोर्डे, नंदकिशोर गोर्डे, सिद्धार्थ सदाफुलें, दत्ता ताकवाले ,शाकिर शेख,जाकीर शेख, आसेफ शेख, अमजत शेख, भगवान गोर्डे, अजीम शेख , लक्ष्मण पटेकर, अरुण पटेकर, कैलास गोर्डे, दयानंद गोर्डे, दादासाहेब फाटके आदींची उपस्थिती होती.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button