छत्रपती संभाजीनगर
घराची भिंत कोसळून झोपेत असलेल्या वृद्ध महिलेचा मृत्यू
पैठण : तालुक्यातील नांदर येथे घराची भिंत कोसळून घरात झोपेत असलेल्या वृद्ध महिलेवर अंगावर पडल्याने भिंतीखाली दबून महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुखद घटना बुधवारी (दि.८) रोजी सकाळी उघडकीस आली. सुंदरबाई साहेबराव गरड (वय ८५, नांदर ) असे मृत महीलेचे नाव आहे.
सुंदरबाई गरड या नेहमीप्रमाणे रात्री नांदर येथे असलेल्या घरात झोपलेल्या असताना रात्री झालेल्या मुसळधार पावसाने घराची भिंत कोसळून अंगावर पडल्याने भिंतीखाली दबून त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून पाचोड पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक माळी,बिट जमादार किशोर शिंदे यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला आहे.