राजकीय
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या देवळाली प्रवरा शहराध्यक्षपदी कदम
देवळाली प्रवरा प्रतिनिधी : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या देवळाली प्रवरा शहराध्यक्ष पदी दिपक विठ्ठल कदम पाटील यांची निवड करण्यात आली आहे. निवडीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तसेच शिर्डी साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त तथा महावितरणचे माजी सदस्य अजित पाटील कदम यांनी दिले. दिपक कदम यांचा मोठा युवा मित्रपरिवार असल्याने युवक संघटन बळकट होण्यास मदत मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी नगरसेवक शैलेंद्र पाटील कदम, शहराध्यक्ष केदारनाथ चव्हाण, तनपुरे कारखान्याचे संचालक अशोक खुरूद, युवा नेते अभय कदम, सुनील कदम, राष्ट्रवादी सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष जगदिश ढुस, राहुरी फॅक्टरी शहराध्यक्ष विक्रांत पंडित, VJNT सेल शहराध्यक्ष शंकर धोत्रे, विद्यार्थी शहराध्यक्ष ऋषी संसार, विठ्ठल कदम, बाळासाहेब कदम, नवनाथ कदम, शरीफभाई शेख, अरुण ढुस, भागवत मुसमाडे, प्रमोद बर्डे, कारभारी मुसमाडे, गोविंद टिक्कल, जगन्नाथ येवले, सुनील विश्वासराव, अक्षय चोथे, गणेश चोथे, गणेश वरखडे, दीपक भंडारे, योगेश चोथे, ज्ञानेश्वर चोथे, सुरेश मोरे, संदीप वाबळे, अमोल कदम, अक्षय कदम, अभिजित कदम, गणेश कदम, धनंजय शेटे, किरण कानडे, अक्षय राजळें, विशाल कदम, आदिनाथ कौसे, कार्तिक मोरे, मोहित मोरे, महेश पंचमुखे, बाळासाहेब लहारे, संदीप येवले, विलास मोहितके, किशोर कानडे, अमोल बर्डे, शेखर रोडे, प्रशांत शेंडे, ऋषिकेश गायके, सचिन ताके, बाबासाहेब कोळसे, दत्तात्रय मोरे, सोनू मोरे, प्रशांत औताडे, रविन्द्र काळे, निखिल मोढे, अण्णा सजगुरे, गणेश अवारे, भारत गीते, पप्पू खांदे, किशोर खांदे, गणेश खांदे, बबलु घोळवे, अमर देठे, अनिल पवार, दत्तू बर्डे, मयूर कदम, दिनेश चोथे, अक्षय चोथे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कदम यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.