ठळक बातम्या
कोल्हापूर जिल्हा सैनिक फेडरेशन कार्यालय उद्धघाटन सोहळा संपन्न
कोल्हापुर प्रतिनिधी : आजी- माजी सैनिकांसह असंख्य सामान्य किसानांचे प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टिने जिल्हा सैनिक फेडरेशनच्या कार्यालयाचे उद्धघाटन, सैनिक फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत व राष्ट्रीय उपाध्यक्ष शंभुसेना प्रमुख दिपक राजेशिर्के, राष्ट्रीय कार्याध्यक्ष नारायण अंकुशे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना खा.ब्रिगेडियर सावंत म्हणाले की, जिल्हा सैनिक फेडरेशनचे कार्यालय हे प्रत्येक जिल्हा व तालुका पातळीवर स्थापन करण्यात येणार असुन या कार्यालयाच्या माध्यमातून आजी- माजी सैनिकांसह शेतकरी वर्गाचे प्रश्न सोडविण्याचे काम केले जाणार आहे, त्यासाठी माजी सैनिकांनी संघटित होऊन आपला हक्क प्राप्त केला पाहिजे, देशाचे सैनिक हे फक्त किसानांची मुले व शिव-शंभुभक्तच असतात म्हणूनच सैनिक फेडरेशन जय जवान…जय किसान…जय शंभुराजे… हा घोषणा मंत्र घेऊन मैदानात उतरला असल्याचे सांगितले.
तर सैनिक फेडरेशन व शंभुसेना संघटनेचे धेय्य उद्देश एकच असल्याने आगामी काळात सदैव एकत्र काम करणार असल्याचे सैनिक फेडरेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, ऐतिहासिक राजेशिर्के घराण्याचे वंशज, शंभुसेना प्रमुख रदिपकराजे शिर्के यांनी सांगितले. अनेक छोट्या मोठ्या सैनिक संस्था व सैनिक संघटनांचे एकत्रिकरण करून सैनिक फेडरेशन निर्माण झाले असुन राजकीय व व्यक्तिगत मतभेद विसरुन सैनिक फेडरेशनसाठी सर्व आजी माजी सैनिकांनी जोशाने काम करण्याचे आवाहन कार्याध्यक्ष नारायण अंकुशे यांनी केले.
उद्धघाटन समारंभाच्या अध्यक्ष स्थानी सुभेदार तुकाराम सुर्यवंशी होते. याप्रसंगी वीर नारी अर्थात शहीद पत्नी श्रीमती वृषाली तोरस्कर, भुमी अभिलेख अधिक्षक सौ. सुवर्णा समीर खानोलकर, प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी शिवाजी पोवार , ECHS कोल्हापुर चे OC कर्नल (निवृत) विलास सुळकुडे, शंभुसेना प्रदेश सरचिटणीस व सैनिक फेडरेशन पुणे जिल्हा अध्यक्ष बाबसाहेब जाधव, सैनिक फेडरेशन पश्चिम महाराष्ट्र प्रमुख अनिल सातव , सैनिक फेडरेशन सातारा अध्यक्ष सुर्यकांत पडवळ, दिलीप मोहीते, सैनिक फेडरेशनचे सांगली अध्यक्ष विजय पाटील, वाळवा तालुका कार्याध्यक्ष जालिंदर पाटिल, सचिव अमृत पाटील, चंद्रहार पाटील, संजय माने हे मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी माजी सैनिक प्रशांत कदम यांची सैनिक फेडरेशन कराड तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली, कदम यांना सैनिक फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत व शंभुसेना प्रमुख राजेशिर्के यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे निमंत्रक संयोजक कोल्हापुर शहर सैनिक फेडरेशन अध्यक्ष समीर खानोलकर होते. यावेळी प्रमुख वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.