अहिल्यानगर
वृक्ष देऊन पोलिस निरिक्षकांचे स्वागत
देवळाली प्रवरा प्रतिनिधी : राहुरी पोलिस ठाण्याचे नवनियुक्त पोलिस निरिक्षक राजेंद्र इंगळे यांनी राहुरी पोलिस ठाण्याचा नुकताच पदभार स्विकारला आहे. अहमदनगर चे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसलेे यांच्या एक व्यक्ती एक झाड या संकल्पनेनुसार पदभार स्वीकारल्यानंतर देवळाली प्रवरा मेडिकल हेल्प टीमच्या वतीने त्यांना वृक्ष भेट देऊन त्यांचा स्नेह सत्कार आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, प्रशांत कराळे यांनी केला आहे.