राजकीय
युवा कार्यकर्ते म्हसे यांची देहूरोड शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड
पिंपरी चिंचवड : मराठा क्रांती मोर्चाचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रातील समन्वयक आणि पिंपरी चिंचवड शिवजन्मोत्सव समितीचे सदस्य युवा कार्यकर्ते अभिषेक म्हसे पाटील यांची देहूरोड शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली.
मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनीलआण्णा शेळके यांच्या हस्ते वडगांव मावळ येथील शासकीय विश्रामगृहात त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. सदर प्रसंगी आमदार सुनिल आण्णा शेळके यांचे धाकटे बंधू उद्योजक सुधाकर शंकर शेळके, मावळ तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस अध्यक्ष नवनाथ चोपडे, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष ॲडव्होकेट प्रविण झेंडे, देहूरोड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष ॲडव्होकेट कृष्णा दाभोळे, जनसेवक किशोरभाऊ गाथाडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.