अहिल्यानगर

मतमाउली यात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

श्रीरामपूर/बाबासाहेब चेडे : तालुक्यातील हरिगाव संत तेरेजा चर्च महाराष्ट्रातील सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान मतमाउली भक्तिस्थान येथे पवित्र मरीयेच्या सन्मानार्थ ७५ व्या मतमाउली यात्रोत्सवनिमित्त सर्व धार्मिक कार्यक्रम सरकारच्या कोविडच्या नियमांचे काटेकोर पालन करून साजरा करण्यात येणार असल्याने भाविकांनी ऑनलाइन दर्शन व भक्तीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख धर्मगुरू सुरेश साठे यांनी केले आहे.


  • १ सप्टेंबर रोजी यात्रोत्सव शुभारंभ ध्वजारोह्नाने होणार असून “प.मारिया विश्वासाची राणी” या विषयावर फा.ऐरल फर्नांडीस एस जे यांचे प्रवचन.
  • २ सप्टेंबर रोजी‌ सात संस्काराची ओळख”फा.भाऊसाहेब संसारे
  • ३ सप्टेंबर रोजी“स्नानसंस्कार-फा.अमृत फोन्सेका
  • ४ सप्टेंबर रोजी प्रायश्चित्त संस्कार-फा.प्रकाश भालेराव
  • ५ सप्टेंबर रोजी लग्न संस्कार-फा विलास सोनावणे
  • ६ सप्टेंबर रोजी ख्रिस्तशरीर संस्कार-फा.आशिष म्हस्के
  • ७ सप्टेंबर रोजी गुरुदीक्षा संस्कार-फा.प्रमोद बोधक
  • ८ सप्टेंबर रोजी“पवित्र मातेचा जन्मदिवस-फा रॉक अल्फान्सो
  • ९ सप्टेंबर रोजी दृढीकरण संस्कार-फा थोमस डिकोस्टां
  • १० सप्टेंबर रोजी रुग्नाभ्यंग संस्कार-फा संतोष साळवे


याप्रमाणे नोव्हेनाप्रसंगी प्रवचने सायंकाळी ५ वा. होतील. ११ सप्टेंबर रोजी मतमाउली यात्रोत्सव दिनी नासिक धर्मप्रांत महागुरुस्वामी लूरडस डानियल यांचे दुपारी १२ वा. प्रवचन व सणाची मिस्सा होईल. कोविड १९ विषाणू प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्व भाविकांची सुरक्षितता लक्षात घेता matmaulibhaktisthan या यु ट्यूब प्रसारमाध्यमांद्वारे सर्व कार्यक्रम प्रक्षेपित होतील. ज्या भाविकांना आपले नवस पूर्ण करावयाचे असतील व पवित्र मिस्सा अर्पण करायचा असेल त्यांनी प्रमुख धर्मगुरूशी संपर्क साधावा असे आवाहन प्रमुख धर्मगुरू सुरेश साठे यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button