ठळक बातम्या

छत्रपतींच्या संकल्पनेतील सुराज्य निर्मितीसाठी एकसंघ समाज निर्मितीची गरज – भाऊसाहेब पगारे

सोनगावात राजन ब्राम्हणेंनी साजरी केली अनोखी शिवजयंती

राहुरी / बाळकृष्ण भोसले – रिपाइं आंबेडकर गट हा सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्याची निर्मिती केली. त्यांच्या स्वप्नातील सुराज्य सुस्थापित होण्यासाठी एकसंघ समाजनिर्मितीसाठी युवकांनी प्रयत्न करायला हवेत. जातीधर्माच्या पलीकडला भारत पाहून विकासात्मक गोष्टीवर भर देत सर्वसमावेशक मुल्यांसाठी प्रयत्न करायला हवेत अशी अपेक्षा रिपाइं आंबेडकर पक्षाचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे यांनी व्यक्त केले.
तालुक्यातील सोनगाव येथे रिपाइं आंबेडकर पक्षाच्या वतीने राजन ब्राम्हणे यांनी शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने अनोखे उपक्रम साजरे करीत सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना प्रोत्साहित करत शिवजन्मोत्सव साजरा केला. त्या अनुषंगाने समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना समाजभूषण गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी सामजिक बांधिलकी जोपासून वृक्षारोपण व सामजिक ऐक्य जनजागृती मेळावा पार पडला. 
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोनगाव येथे आरपीआय आंबेडकर गटाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले. यावेळी पंचायत समितीच्या माजी सभापती मनीषा ओहोळ, रिपाइं जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे, दत्तनगरचे लोकनियुक्त सरपंच सुनील शिरसाठ, केलवडचे माजी सरपंच संजय गोडगे आदींना समाज भूषण गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
या कार्यक्रमास स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सिमोन जगताप, आरपीआय युवक जिल्हाध्यक्ष सचिन ब्राम्हणे, वंचित बहुजन आघाडीचे युवक जिल्हाध्यक्ष प्रवीण आल्हाट, विजय पवार, पिंटूनाना साळवे, निलेश जगधने, डॉ.विजय मकासरे, तालुकाध्यक्ष प्रदीप मकासरे, सुनील रुपवते, सनी जगताप, प्रतिक रुपटक्के, गौतम पगारे, भावेश ब्राम्हणे, शामराव अंत्रे, संभाजी कडू, सचिन सिनारे, सनी बनसोडे, दिनेश पलघडमल, आकाश भिंगारदिवे, रवी गायकवाड, अशोक ब्राम्हणे, भाऊसाहेब अंत्रे, बाळासाहेब वाघमारे, पोलीस पाटील अनिल अंत्रे, भास्कर पलघडमल, अनिल पलघडमल, उत्तर महाराष्ट्र सचिव महेश सुराडकर रमेश पलघडमल,प्रतिक खरात,प्रशांत पलघडमल, गंगा मोहारे आदी उपस्थित होते. प्रसंगी सोनगाव पेठेत वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन व प्रास्तविक आरपीआय जिल्हा सचिव राजन ब्राम्हणे यांनी केले.

Related Articles

Back to top button