छत्रपती संभाजीनगर
अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्ध जखमी
पैठण /विलास लाटे : पैठण औरंगाबाद मुख्य रस्त्यावर ईसारवाडी नजीक असलेल्या पेट्रोल पंपासमोर रस्त्याने पायी जात असलेल्या ६० वर्षीय वृद्ध अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. चिंतामण वाघमारे (रा.ईसारवाडी) असे जखमी वृद्धाचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, वाघमारे रविवारी रात्री सात-साडेसात वाजेच्या सुमारास पैठण औरंगाबाद रस्त्याने पायी जात असताना ईसारवाडी नजीक असलेल्या पेट्रोल पंपासमोर त्यांना अज्ञात वाहनाने जोरात धडक दिली. यात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती ढोरकीन येथील आपात्कालीन विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ शैलेश घोडके यांना कळताच त्यांनी रुग्णवाहिका चालक लतीफ शेख यांच्यासह घटनास्थळी धाव घेत, जखमींवर प्रथमोपचार करून औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारकामी रवाना केले.