अहिल्यानगर
गिते यांची भाजप किसान मोर्चाच्या सचिवपदी निवड
चिंचोली प्रतिनिधी : संगमनेर तालुक्यातील पिंप्री लौकी येथील सामाजिक कार्यकर्ते भारत गिते यांची भाजप किसान मोर्चाच्या संगमनेर तालुका सचिव पदी नुकतीच निवड झाली. त्यांना निवडीचे पत्र देत माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी भाजपचे राजेंद्र गोंदकर, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सतिश कानवडे, जि. प. सदस्य जालिंदर वाकचौरे अदि उपस्थित होते. भारत गिते हे माजी मंत्री राधाकृष्ण विखे पा कट्टर समर्थक म्हणुन ओळखले जातात. त्यांनी आश्वी जि प गटासह संपुर्ण संगमनेर तालुक्यात शेतकरी व सर्व सामान्य माणसाला न्याय मिळवुन देण्यासाठी प्रयत्न केले. निळवंडे कालवा दुध भाववाढ अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे नुकसान आदी प्रश्नी वेळोवेळी आंदोलने करत आवाज उठविला आहे. भविष्यकाळात शेतकऱ्यांच्या हितासाठी व न्याय हक्कासाठी ते भाजपा किसान मोर्चाच्या माध्यमातुन उतम काम करतील असा विश्वास माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त करत त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे युवा नेते खा डॉ सुजय विखे पा, जिल्हा परिषेदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पा, जि प सदस्य अँड रोहिणीताई निघुते, पं. स सदस्य निवृत्ती पा सांगळे, सौ दिपालीताई डेंगळे, प्रवरा बॅकेचे माजी चेअरमन बाळासाहेब भवर, अँड पि.जी.वाणी, अँड अनिलराव भोसले, विखे कारखान्याचे संचालक डॉ दिनकरराव गायकवाड, पं.स. मा सभापती अंकुशराव कांगणे, एकनाथ नागरे पाटील, सरपंच म्हाळु गायकवाड, सचिन गायकवाड, अशोक तळेकर, नारायण काका कहार, सुरेशराव नागरे, प्रकाशराव शिंदे, आर डी कदम, प्रा कान्हु गिते, सरपंच सौ नंदाताई गिते, भाऊसाहेब लावरे, सिताराम गिते, भिमराज गिते रमेशशेठ गिते, उपसरपंच विकास दातीर, भाऊसाहेब पा मुंढे, अण्णासाहेब म्हस्के, भाऊ पाटील गायकवाड, मच्छींद्र पावडे, ह भ प शांताराम महाराज जोरी अदिनी अभिनंदन केले आहे