अहिल्यानगर
तारकपूर आगारात एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन; लालपरीच्या कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची प्रकाश पोटेंची मागणी
राहुरी विद्यापीठ/जावेद शेख : नगर येथील तारकपूर आगाराच्या राज्य परिवहन कर्मचारी व एसटी कर्मचाऱ्यांनी एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य शासनात विलीनीकरण करून शासन निर्णयाप्रमाणे सर्व सोयी सवलती व वेतन लागू करण्यात यावे या मागणीसाठी बेमुदत कामबंद आंदोलन केले.
व्हिडिओ पहा : तारकपूर आगारात एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन; लालपरीच्या कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची प्रकाश पोटेंची मागणी
यावेळी एसटी कर्मचार्यांच्या आंदोलनाला जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे यांनी पाठिंबा दिला. पोटे बोलताना म्हणाले की राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना शासनाच्या इतर विभागांच्या तुलनेत कमी वेतन मिळत असून हे अन्यायकारक आहे व कर्मचार्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे सरकारने मागण्या मान्य कराव्यात व लाल परीच्या कर्मचाऱ्यांना न्याय देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.
यावेळी जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, मनसेचे नितीन भुतारे, भाजपाचे भैय्या गंधे, अभिषेक दायमा, गणेश ननवरे, तुषार पोटे, एसटी कर्मचारी अशोक टकले, प्रवीण दळवी, विनोद गोरे, उषा उदावंत, सोनाली शिंदे आदींसह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिलेल्या पगारात मूलभूत गरजा भागविणे कठीण झाले आहे. त्यामुळे कर्मचारी कर्जबाजारी झालेला आहे. या नैराश्यातून कर्मचाऱ्यांनी आत्महत्येसारखे पाऊल उचलले आहे. आत्महत्येचा आकडा 36 पर्यंत पोहोचला आहे व तो वाढतच आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन हे राज्य शासनात विलीनीकरण करून सर्व सवलती राज्य शासना प्रमाणे देण्यात याव्यात. याकरिता तारापूर आगारातील कर्मचारी बेमुदत संपात सहभागी झालेले आहे.