छत्रपती संभाजीनगर

नांदर येथील वीरभद्र नदीवरील पुलाच्या बोगस दुरूस्तीची चौकशी करा

नांदर येथील वीरभद्र नदीवरील पुलाच्या बोगस दुरूस्तीची चौकशी करा अशा मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष संजय सदावर्ते यांनी केली आहे.


पैठण / विलास लाटे : तालुक्यातील नांदर येथील वीरभद्र नदीवरील पुलाची मागील वर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे नदीला अनेक वेळा पुर आला होता. त्यामुळे नदीवरील पुलावर मोठा खड्डा पडला होता. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आवाज उठवला असता प्रशासनाने तात्काळ दखल घेत पुलांच्या दुरूस्ती साठी पंधरा लाख रूपये खर्चाची दुरूस्ती मंजूर होती. त्या दुरूस्तीचे काम तीन महिण्यापुर्वीच पैठण तालुक्यातील एका ठेकेदाराच्या मार्फत करण्यात आले. ठेकेदाराने फक्त ज्या ठिकाणी खड्डा पडला होता त्यांच ठिकाणी बोगस काम करून फक्त चार नळ्या बसवून, उर्वरीत पुलांवरील खड्ड्यात साधी वाळू भरल्यामुळे काल झालेल्या पावसाने ती सर्व वाळू वाहुन गेल्यामुळे पुलांवरील खड्डे पुन्हा उघडे पडले.

तसेच पुलांच्या भींतीला पडलेले खड्डे तसेच ठेवून थातुरमातुर दुरूस्ती केली आहे. सदरील पुलांच्या दुरूस्तीसाठी पंधरा लाख रूपये निधी आला असतांनी चारच नळ्या बसवून बोगस बिलं काढण्यात आली आहे. आज घडीला मोठा पाऊस होऊन नदीला पूर आला तर कोणत्या ही क्षणी हा पुल वाहुन जाऊ शकतो. त्यामुळे ग्रामस्थांच्या दळण वळणांचे एकमेव साधन असलेल्या पुलाच्या सर्व बोगस कामांची चौकशी करून संबंधित ठेकेदार तसेच अधिकार्यांवर कारवाई करून पुलाची तात्काळ दुरूस्ती करावी, अशी मागणी तहसीलदार चंद्रकांत शेळके व उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. आठ दिवसांच्या आत दुरूस्ती न केल्यास नांदर येथील वीरभद्र नदीवरील पुलावरच बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संजय सदावर्ते यांनी दिला आहे.

Related Articles

Back to top button