औरंगाबाद
शासकीय कर्मचाऱ्यांने जंगम मालमत्ता व्यवहाराची विवरण पत्रे सादर करावे : छावा क्रांतिवीर सेनेची मागणी
पैठण/ विलास लाटे : शासन निर्णय क्रमांक सी डी आर १०११ दिनांक ७ मे २०१३ च्या निर्णयानुसार प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यांनी जंगम मालमत्ता व्यवहाराची विवरण पत्र सादर केले पाहिजे परंतु त्याची अंमलबजावणी केली जात नाही यासाठी छावा क्रांतिवीर सेना या संघटनेने (दि.१८) पैठण तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांना निवेदन देवून सदर निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.
सदर निवेदनात नमूद असे की, प्रत्येक कार्यालयाच्या अधीनस्त असलेल्या अधिकारी-कर्मचारी यांनी त्याने स्वतःच्या नावाने किंवा त्याच्या कोणत्याही कुटुंबियांच्या नावाने केलेला ज्याची किंमत त्याच्या दोन महिन्याच्या मूळ वेतनापेक्षा अधिक असेल असा जंगम मालमत्तेचे व्यवहार प्रत्येक व्यवहार कार्यालयास कळवा असे शासन आदेश आहेत. बरेच कार्यालयात आदेशाचे पालन झालेले नाही, शासन निर्णयाचा अवमान केलेला आहे. त्यामुळे तालुक्या अंतर्गत असणारे विविध कार्यालय प्रमुखास याबाबत त्वरित पूर्तता करण्यात यावी असे आदेशित करावे, जेणेकरून अपसंपदा बेहिशोबी मालमत्ता यावर निर्बंध येतील. अवैध मार्गाने पैसे कमावणारे अधिकारी कर्मचाऱ्यांवर वचक राहील. ज्या कर्मचाऱ्यांनी वा अधिकाऱ्यांनी दोन महिन्याचे मुळ वेतनापेक्षा अधिक असेल अशी जंगम मालमत्ता खरेदी केली असेल तर, त्या मालमत्तेची खरेदीची चौकशी व्हावी. सदर मालमत्तेचे बाजारमूल्य आणि त्यासाठी दिलेली किंमत कोणत्या मार्गाने जमा केली याबाबत सर्व शासकीय अधिकारी- कर्मचारी यांच्याकडून नियत दिनांकापर्यंत त्यांचे मालमत्ता व दायित्व विवरणपत्रे प्राप्त होऊन ती अभिलेखावर ठेवली जातील याची जबाबदारी संबंधित सक्षम प्राधिकाऱ्याची असते आणि यामुळे पैठण तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार या अधिकाराने आपल्या कार्यात असलेले कार्यालय व कार्यालय प्रमुखास तसेच अधिकारी कर्मचारी यांना शासन निर्णयानुसार जंगम मालमत्ता संदर्भात केलेला व्यवहार बाबतीतील विवरण पत्राद्वारे पूर्तता करावी असे आशयाचे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस अनिल राऊत, मराठवाडा अध्यक्ष रामेश्वर बावणे, सचिव भगवान सोरमारे, राजेंद्र कारेगावकर आदी उपस्थित होते.