निधन वार्ता
लक्ष्मीबाई गलांडे यांचे निधन
श्रीरामपूर ( बाबासाहेब चेडे ) : श्रीरामपुर तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार व
अशोक स.सा.का. चे माजी चेअरमन, महाराष्ट्रातील एक धुरंधर नेतृत्व कै. भास्करराव गलांडे पाटील यांच्या पत्नी श्रीमती लक्ष्मीबाई भास्करराव पाटील गलांडे ( वय – ८६ ) यांना आज २१ ऑगस्ट २०२१ रोजी पहाटे देवाज्ञा झाली. त्यांचा अंत्यविधी दुपारी श्रीरामपूर अमरधाम येथे पार पडला. अंत्यविधी प्रसंगी मा.आ. मुरकुटे यांनी कै लक्ष्मीबाईंच्या अंत्ययात्रेस खांदा दिला. श्रद्धांजली वाहत असताना पूर्वीच्या आठवणी सांगताना मा.आ. मुरकुटेंना भावना अनावर झाल्या व ते आपल्या अश्रूंना रोखू शकले नाही. अंत्यविधीसाठी लोकनेते मा.आ. भानुदासजी मुरकुटे, उपनगराध्यक्ष करण जयंत ससाणे, माजी चेअरमन सुरेश पाटिल गलांडे, नगरसेवक संजय फंड, श्रीनिवास बिहाणी, संजय छललारे, सौ. भारती कांबळे, राजेंद्र पाटील पाऊलबुद्धे व तालुक्यातील इतर मान्यवर उपस्थित होते. लक्ष्मीबाई भास्करराव पाटील गलांडे यांना अनेक मान्यवर व ग्रामस्थानी श्रद्धांजली वाहिली.