आरोग्य
अहमदनगर शहरात विविध ठिकाणी मानसिक आरोग्य प्रथमोपचार बाबत दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
अहमदनगर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, पुणे, आदित्य बिर्ला एज्युकेशनल ट्रस्ट, मुंबई, आणि एम.पावर माईंड, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने तरुणांच्या मानसिक आजारासाठीचे प्रथमोपचार प्रशिक्षण कार्यक्रमाचे दि. ११ जुलै ते १६ जुलै २०२२ या कालावधीत आयोजन करण्यात आले होते. शहरातील न्यू आर्टस् सायन्स अंड कॉमर्स महाविद्यालय, सी.एस.आर.डी संशोधन व प्रशिक्षण संस्था, राधाबाई महिला महाविद्यालय या ठिकाणी दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या दोन दिवसीय प्रशिक्षणासाठी एम पावर माईंड, मुंबई यांच्या श्रद्धा पोळ, हर्षदा थत्ते, राधिका मापुसकर, आणि रुचिरा उचील यांनी प्रशिक्षिका म्हणून भूमिका बजावली. या प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थ्यांना चिंता विकृती, अवसाद विकृती, आहार विकृती, व्यसनाधीनता, शारीरिक आणि मानसिक छळ यासारख्या मानसिक आजारांसाठी कशा पद्धतीने प्रथम उपचार देता येऊ शकतो याविषयी प्रशिक्षण दिले गेले. हे प्रशिक्षण सामाजिक कार्यकर्ते, समान साधी केंद्र सदस्य, मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणारे सदस्य, शिक्षण, विद्यार्थी यांचे करीता आयोजित करण्यात आले होते. सदर प्रशिक्षण करिता अहमदनगर शहरातून १५० प्रशिक्षणार्थी यांनी उस्फुर्त पणे सहभाग नोंदवला.
प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना एम पावर माईंड आणि बार्टी, पुणे यांकडून सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात आले. प्रशिक्षणानंतर घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये ४५ प्रशिक्षणार्थ्यांनी ८०% पेक्षा अधिक गुण प्राप्त करत हे प्रशिक्षण विशेष प्राविण्यासह पूर्ण केलेे. यावेळी त्यांना त्यांच्या विशेष प्राविण्याबद्दल एम्पावर माईंड आणि बार्टीकडून मानसिक प्रथमोपचार कार्यकर्ते म्हणून प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
अहमदनगर शहरात प्रशिक्षण कार्यक्रम आयोजन करिता सी.एस आर. डी. महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. सुरेश पठारे, श्री.वाघमारे सर, श्री. जरे सर तसेच न्यू आर्ट्स चे श्री. काकडे सर, काळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर थोपटे, मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ. एजाज शेख, प्रा. सतीश शिर्के, डॉ. मंजुश्री भागवत यांचे विशेष सहकार्य लाभले. बार्टीचे समतादूत एजाज पिरजादे, प्रेरणा विधाते, रविंद्र कटके, वसंत बढे, संतोष शिंदे यांनी प्रशिक्षण आयोजनासाठी कष्ठ घेतले.