मराठवाडा

कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीचे निरीक्षक गायके यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

कळंब (प्रतिनिधी) – कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीचे निरीक्षक पदावरून सेवानिवृत्त झालेले उत्तरेश्वर गायके यांचा यशवंत किसान विकास मंचाच्या वतीने शाल, श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.

गायके यांनी दीर्घ काळ सेवा बजावताना बाजार समितीच्या कामकाजात पारदर्शकता आणि शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण राबवण्यात मोलाचा वाटा उचलला. त्यांच्या कार्याची दखल घेत मंचातर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला.

या वेळी बाजार समितीचे संचालक लक्ष्मण नाना कोल्हे, यशवंत किसान विकास मंचाचे अमोल अण्णा शेळके, व्यापारी प्रमोद बलदोटा, लक्ष्मीकांत जोशी, बालाजी लाखे तसेच राखुंडे बप्पा हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी उत्तरेश्वर गायके यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button