अहिल्यानगर
शहरामधुन होणारी प्रवासी वाहतूक बाह्यवळण रस्त्याने वळवा – छावाची मागणी
राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी : अहमदनगर शहरामध्ये पुलाचेऔछो काम चालू असून बाहेरगावावरून येणार्या खाजगी प्रवासी वाहतूक करणारे वाहने, बसेस आदी गाड्यांना पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत बाह्यवळण रस्त्याने वळवण्यात यावी,अशा मागणीचे निवेदन अखिल भारतीय छावा संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे देण्यात आले आहे.
यावेळी महिला जिल्हाध्यक्ष सुरेखाताई सांगळे समवेत जिल्हा सचिव गणेश गायकवाड, भिंगार शहराध्यक्ष गणेश शिंदे, तालुका उपाध्यक्ष गोरख आढाव, काका पाटील गायके, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे बाळासाहेब ढवळे, मीनाक्षी जाधव, महेमूद पठाण, किशोर शिकारे, भारत फुलमाळी, बाळासाहेब तोडमल नितीन पोटे उमेश कवडे आदी उपस्थित होते.
अहमदनगर शहरामध्ये सक्कर चौक ते पोलीस अधीक्षक कार्यालय या ठिकाणचे पुलाचे काम चालू आहे. त्या कामामुळे विविध ठिकाणी खोदकाम करण्यात आलेले आहे. या कामाच्या अनुषंगाने शहर वाहतूक विभागाने काही ठिकाणी वाहतूक देखील वळविलेली आहेत व मार्ग बंद करण्यात आलेले आहेत तसेच बाहेरगावावरून येणार्या प्रवासी वाहतूक हे राजरोसपणे वाहतुकीचे सर्व नियम मोडून शहरामध्ये पुलाचे काम चालू असताना त्या रस्त्यावरून जातात व तेथे सध्या ट्राफिक जाम होत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये वाहकास रस्त्यावरील खड्डे पुलाच्या कामासाठी लावलेल्या बॅरिकेट याचा अंदाज न आल्यास मोठा अपघात होऊ शकतो व यामध्ये प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. यापूर्वीदेखील छोटे-मोठे अपघात या ठिकाणी झालेले आहेत. या सर्व घटना होऊ नये या अनुषंगाने शहरांमध्ये बाहेरगावावरून येणार्या प्रवासी वाहतुकीस पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत बाह्यवळण रस्त्यावरून जाण्याचे आदेश द्यावेत व यामुळे शहरामध्ये ट्राफिक जाम देखील होणार नाही.