ठळक बातम्या
जीव वाचवणार्या तरूणांचा पोलिस निरीक्षकांनी केला सत्कार
राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी : मुळा धरणात बुडालेल्या दोन तरुणांपैकी एका तरुणाचा जीव वाचवणारे विकास गंगे व इंद्रजीत गंगे या दोघांचा तसेच ग्रामपंचायत सदस्य सलीमभाई शेख आणि शोधकार्यात सहभागी झालेल्या गावातील इतर तरुणांचा राहुरी पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस निरीक्षक दुधाळ व त्यांच्या सहकार्यांनी सत्कार केला.
यावेळी पोलीस निरीक्षक दुधाळ यांनी सर्व तरुणांचे कौतुक करून शाबासकी दिली. ग्रामपंचायत सदस्य सलीमभाई शेख हे नेहमीच प्रशासनास मदत करत असतात. समाजाच्या प्रति कर्तव्य बजावत असतात. त्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी राहुरी पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल जाधव, चव्हाण, ताजने व इतर कर्मचारी, आर.पी.आय. जिल्हाध्यक्ष सुरेंद्र भाऊ थोरात, ग्रामपंचायत सदस्य सलीमभाई शेख, आदिवासी नेते कैलास बर्डे, विकास गंगे, इंद्रजीत गंगे, किशोर पवार, अशोक गायकवाड, सुमित पलघडमल, साहिल शेख, सुरेश बर्डे, सादिक शेख तसेच पत्रकार बंधू उपस्थित होते.