अहिल्यानगर

प्राचार्य अनारसे यांचा “शब्दसुगन्ध” रयतसंस्कृतीचे शब्दधन होय : प्राचार्य टी.ई. शेळके

श्रीरामपूर / बाबासाहेब चेडे : साहित्य हे अल्प जीवनाला दीर्घकाळ अमरत्व प्राप्त करून देणारे असते, प्राचार्य शन्करराव आत्माराम अनारसे यांनी लिहिलेला ‘शब्दसुगन्ध’ हा लेखकाच्या लेखणीतून रयतसंस्कृतीचे शब्दधन प्रेरणादायी आणि मौलिक स्वरूपाचा असल्याचे मत अड अॅड रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे चेअरमन माजी प्राचार्य टी. ई. शेळके यांनी व्यक्त केले. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी स्वागत, प्रास्ताविक करून पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्राचार्य शेळके यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी प्रकाशक पत्रकार प्रकाश कुलथे यांनी आपले अनुभव सांगून प्राचार्य अनारसे हे प्रामाणिक लेखक असून वयाच्या 83 व्या वर्षी लिहिलेले पुस्तक म्हणजे अनुभव आणि मुक्त लोकसंवाद असल्याचे सांगितले. ज्येष्ठ नागरिक आनंद मेळाव्याचे अध्यक्ष लक्ष्मणराव निकम, दामोदर जानराव यांनी डॉ.संजय अनारसे, डॉ.सौ.योगिता अनारसे यांनी मनोगत व्यक्त केले. स्वामीराज कुलथे यांनी असे दर्जेदार पुस्तक निर्मितीचा आनंद व्यक्त करीत डॉ. बाबुराव उपाध्ये लिखित “आदर्शाचं देवालय “ही प्राचार्य अनारसे यांच्यावरील कविता सादर केली. सौ.कमलताई अनारसे, डॉ. संजय अनारसे आणि डॉ.सौ. योगिता अनारसे यांनी सर्वांचा सत्कार केला. सूत्रसंचालन डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी केले तर बाबासाहेब चेडे यांनी आभार मानले.

Related Articles

Back to top button