अहिल्यानगर
संभाजीनगर श्रीरामपूर येथे विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा उत्साहात
श्रीरामपूर[बाबासाहेब चेडे] : मंदिर बांधणे सोपे आहे परंतु त्या मंदिराचे पावित्र्य व नित्य पूजा सर्वांनी भाव भक्तीने व प्रत्येक कुटुंबाने दररोजच्या सेवेत सहभाग घ्यावा व भगवान पांडुरंगास फक्त मंदिरात न ठेवता आपल्या हृदयात घेतले तरच अध्यात्म साध्य होऊन आपल्याला आशीर्वाद मिळतो, असे प्रतिपादन विठ्ठल रुक्मिणी, गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा प्रसंगी ह.भ.प.हरीशरणगिरिजी महाराज यांनी केले.
श्रीरामपूर शहरातील संभाजीनगर येथे श्री गणेश व विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे मूर्तींची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण ह.भ.प.हरीशरणगीरीजी महाराज यांच्या हस्ते सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी त्यांचे कीर्तन, प्रवचन आयोजित केले होते. याप्रसंगी लोकनियुक्त नगराध्यक्षा अनुराधा आदिक म्हणाल्या की एकएक रुपया जमा करून अतिशय सुंदर मंदिर संभाजीनगरवासियांनी बांधले. संभाजीनगरचा आदर्श सर्वांनी घ्यावा व अशीच एकता संभाजीनगरमध्ये राहावी. ते गौरवास नक्कीच पात्र आहेत.
या कार्यक्रमास ह.भ.प.हरीशरणगीरीजी महाराज, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, अर्चनाताई पानसरे, कैलास दुबैय्या, सोमनाथ गांगड, संजय गांगड, राजेंद्र सोनावणे, भजनी मंडळ, संभाजीनगर रहिवासी, परिसरातील सर्व बंधू भगिनी व देणगीदार उपस्थित होते. महाप्रसाद वाटप होऊन सोहळ्याची सांगता झाली.