कृषी
कृषिदूत दहिफळे यांची शेतकऱ्यांना लसीकरणाविषयी माहिती

गणेशवाडी येथील शेतकऱ्यांना लसीकरणा विषयी माहिती देताना कृषिदूत दहिफळे
राहुरी विद्यापीठ/ जावेद शेख : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषि महाविद्यालय भानसहिवरे नेवासा येथील अंतिम वर्षात शिकत असलेली विद्यार्थिनी दहिफळे मेघा सुभाष हिने गणेशवाडी येथील शेतकऱ्यांना लसीकरणा विषयी माहिती दिली. त्यामध्ये गायी, म्हशीसाठी वापर केल्या जाणार्या लसीकरण विषयी माहिती सांगितली. महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषी कार्यक्रम,कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत प्रा. डॉ.अतुल दरंदले, प्रा. एम.आर माने, प्रा. गाजरे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.