अहिल्यानगर

खरे कोरोना योद्धांचा सन्मान होणे गरजेचे – डॉ विकासनंदजी महाराज मिसाळ

पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना डॉ विकासनंदजी महाराज मिसाळ समवेत डॉ सौ.उषाताई तनपुरे, रामानंद गिरी महाराज, गणेश भांड आदी.


आरडगांव प्रतिनिधी/ राजेंद्र आढाव : स्वतःकरिता युद्ध करणारे पाहिले पण दुसऱ्या करीता युद्ध करणारे खरे कोरोनायोद्धाचा सन्मान होणे गरजेचे आहे,असे गौरवोद्गार कृष्ण कृपांकित वैराग्यमुर्ती ह.भ.प.डॉ विकासनंदजी महाराज मिसाळ यांनी व्यक्त केले.
    राहुरी तालुक्यातील राहणे पाटील मंगल कार्यालय आरडगांव येथे महाराष्ट्र राज्य हिंदू रक्षक वारकरी संत परिषद यांच्या वतीने कोरोना योद्धा पुरस्कार सन्मान सोहळा माजी नगराध्यक्षा डॉ सौ.उषाताई तनपुरे, चैतन्य उद्योग समूह गणेश भांड, संचालक डॉ तनपुरे कारखाना शामराव निमसे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अनिल बांगरे या मान्यवरांच्या हस्ते व स्वामी रामानंद गिरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष किशोरजी महाराज जाधव, उपाध्यक्ष संजय शेटे,माऊली क्षिरसागर,साहेबराव मोरे, औचितानंद महाराज अहिरे, जितेंद्र वाघ, सुरेश उंडे, दिपक बुरुंडे, भगवान नाईकवाडे, हेमंत पाटील, प्रभाकर कुमकर या विश्वस्तांसह व गोकुलदास आढाव, शंभुगिरी बाबा गोसावी, सुरेश निमसे, आदिनाथ महाराज हारदे, शितलताई साबळे, गोरक्षनाथ ढोकणे, राजूबाबा शेवाळे, दिलीप खळदकर, बाळासाहेब मोरे, नितीन वाकचौरे, दत्तात्रय महाराज मुसमाडे, रामेश्वर तारडे, डॉ बाबासाहेब आढाव, संजय पोटे आदी मान्यवरांची उपस्थिती होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अप्पासाहेब ढोकणे यांनी केले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button