अहिल्यानगर
आरपीआय आंबेडकर गटाच्या नगर जिल्हा कार्याध्यक्षपदी पापाभाई बिवाल यांची निवड
राहुरी / बाळकृष्ण भोसले – येथील फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते पापाभाई बिवाल यांची आरपीआय आंबेडकर गट दक्षिण नगर जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड झाली आहे.
मुंबई येथे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांच्या उपस्थितीत पापाभाई बिवाल यांनी आरपीआय आंबेडकर गटात प्रवेश केला. यावेळी बिवाल यांना राष्ट्रीय अध्यक्ष निकाळजे यांच्या हस्ते दक्षिण नगर जिल्हा कार्याध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी बोलताना राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे म्हणाले की, नगर जिल्ह्यात पक्षाचे कार्य जोमात सुरू असून सर्व धर्मातील व विविध गटातील कार्यकर्त्यांना एकत्रित करून पक्षाची आणखी ताकद वाढविण्याचे काम सर्वाना एकत्रित राहून करायचे आहे. आगामी काळात जिल्हा परिषद-पंचायत समिती व नगरपालिका निवडणूका होत असल्याने कार्यकर्त्यांनी कामाला लागा. तुमच्या मागे संपूर्ण ताकद उभी केली जाईल असे ते म्हणाले.
यावेळी महाराष्ट्र कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार, नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे, जिल्हा संपर्क प्रमुख बंडू आव्हाड, पँथरचे तानाजी मिसळे, युवकचे दक्षिण जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटोळे, जिल्हा सचिव राजन ब्राम्हणे, राहुरी तालुकाध्यक्ष प्रदीप मकासरे, युवक शहराध्यक्ष संदीप वाघमारे, जॉन पाटोळे, दिनेश पंडीत, सचिन शेलार, श्री.साठे, श्री.कांबळे आदी उपस्थित होते.