अहिल्यानगर
नियोजित शहीद स्मारक येथे कारगिल विजय दिवस साजरा
शहिद स्मारकाचे काम सुरु करण्याची घोषणा.पुष्पचक्र वाहून शहिदांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
अहमदनगर प्रतिनिधी – जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने तपोवन रोड येथील नियोजित शहीद स्मारक येथे कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. यावेळी शहिद स्मारकाचे काम सुरु करण्याची घोषणा करण्यात आली. माजी मंत्री शिवाजी कर्डिले, उपवनसंरक्षक सुवर्णाताई माने, तहसिलदार उमेश पाटील, आरएफओ सुनिल थिटे, सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, पो.नि. सतीश शिरसाठ, प्राचार्य बिडवे, डॉ. दरंदले, हभप राम घुले महाराज, जीएसटी अधिकारी अमोल धाडगे यांच्या हस्ते पुष्पचक्र वाहून कारगीलमध्ये शहिद झालेल्या जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
शिवाजी कर्डिले म्हणाले की, जवान हे देशाचे भूषण आहे. त्यांच्या योगदानामुळे प्रत्येक भारतीय सुरक्षित असून, त्यांचे उपकाराची परतफेड करता येणार नाही. कारगीलचा विजयी लढा प्रत्येक भारतीयांना स्फुर्ती देणारा आहे. भारतीय जवान सिमेवर देश रक्षणाचे कर्तव्य चोखपणे बजावत आहे. तर सेवानिवृत्तीनंतर देखील समाजसेवा करताना पाहून त्यांचा अभिमान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. तर शहिद स्मारकसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. उपवनसंरक्ष सुवर्णाताई माने यांनी पर्यावरण संवर्धनासाठी माजी सैनिकांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. वृक्षरोपण व संवर्धन काळाची गरज झाली असून, माजी सैनिकांनी या चळवळीला एक दिशा दिली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तपोवन रोड येथे होत असलेल्या शहिद स्मारक मध्ये स्थल सेना, वायु सेना, नौ सेनेत भरती होण्यासाठी युवकांना मार्गदर्शन, स्पर्धा परिक्षा, युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशिक्षण, अभ्यासिका यांचा समावेश असणार असल्याची माहिती शिवाजी पालवे यांनी दिली.
तहसिलदार उमेश पाटील यांनी शहिद जवानांना मानवंदना देत शहिद परिवार व आजी-माजी सैनिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येणार असल्याचे सांगितले. सैनिकांची मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. सैनिकामुळे आपण सुरक्षित असल्याचे ते म्हणाले. यावेळी गणेश बोरूडे, अमोल कांडेकर, फाऊंडेशनचे शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे, निवृती भाबड, संतोष मगर, संभाजी वांढेकर, मनसुक वाबळे, महादेव शिरसाठ, संदिप कराड, महादेव झिरपे, अंकुश भोस, अमोल निमसे, ओमप्रकाश शिंदे, योगेश नरसाळे, संतोष पागीरे, संदिप काळे, सिताराम दांगट, रामेश्वर आव्हाड, सुनिल गुंजाळ, राजेंद्र भागवण, रामेश्वर आव्हाड, बंडू चौधरी, बाळासाहेब पालवे, गणेश पालवे, रमेश पाचारणे, दतात्रय बांगर, खंडेराव लेंडाळ, महादेव करंजुले, बाबासाहेब घुले, निळकंठ उल्हारे, आशाताई साठे, जयश्री सवासे, सुषमा चेमटे, मिनाक्षी राजेभोसले, प्रकाशिनी घोडके, कैलास येवले, शरद साबळे, के.एस. खंडागळे, किरण पालवे, महादेव गर्जे, जाधव, गोरे भाऊसाहेब, संजय साळवे आदी उपस्थित होते.