अहिल्यानगर
उंदिरगाव येथे शिवजयंती उत्साहात साजरी
श्रीरामपूर/ बाबासाहेब चेडे : तालुक्यातील उंदिरगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी गावचे सरपंच सुभाष बोधक, उपसरपंच रमेश गायके यांच्या शुभहस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी चित्रसेन पाटील गलांडे, जि प सदस्य अशोक पवार, पंचायत समिती सदस्य प्रकाश ताके, प्रकाश आढाव, संजय सोमवंशी, अमोल नाईक, बाळासाहेब निपुंगे, मनोज बोडके, सुनील भालदंड, वाघ भाऊसाहेब, विशाल कुराडे, संजय काळे, शोयब शेख आदी उपस्थित होते. या नंतर भास्करराव गलांडे पा. शाळेत कारखान्याचे माजी चेअरमन सुरेश पाटील गलांडे, दूध संघाचे संचालक राजेंद्र पाऊलबुद्धे, कारखान्याचे संचालक विरेश गलांडे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी संचालकपदी निवडून आल्याबद्दल श्री गलांडे यांचा सत्कार करण्यात आला. या नंतर गावातील चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हरेगाव पोलीस स्टेशनचे श्री शिंदे, पवार, राजेंद्र पाऊलबुध्देे, विरेश पाटील गलाडे, सरपंच सुभाष बोधक, उपसरपंच रमेश गायकेे, चित्रसेन पा गंलाडे, बाबासाहेब आव्हाड, किशोर नाईक, आशिष शिंदे, निलेश बर्डेडे, बांद्रे व शिवप्रेमींसह नागरिक, ग्रामस्थ व तरुण वर्ग उपस्थित होता.