आरोग्य
प्रवरा मेडिकलच्या २४ तास घर पोहच सेवेने श्रीरामपूरच्या वैभवात भर – नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक
व्हिडीओ : अनुराधाताई आदिक यांनी दिल्या प्रवरा मेडिकल ला शुभेच्छा…
श्रीरामपूर : प्रवरा मेडिकल अँड सुपर शॉपी च्या माध्यमातून श्रीरामपूरकरांना २४ तास व घर पोहच सेवा उपलब्ध होणार असल्याने श्रीरामपूरच्या वैभवात भर पडली असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक यांनी केले.
देवळाली प्रवरा येथील वैभव ढुस यांनी सुरू केलेल्या प्रवरा मेडिकल अँड सुपर शॉपी दालनाच्या उद्घाटन प्रसंगी नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक बोलत होत्या. या उद्घाटन समारंभास जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, डॉ. तनपुरे साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन दत्तात्रय ढुस, देवळाली प्रवरा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष आण्णासाहेब चोथे, नगरसेवक सचिन ढुस, नगरसेवक ज्ञानेश्वर वाणी, देवळाली प्रवरा सोसायटी चे चेअरमन राजेंद्र ढुस, सनदी अधिकारी दत्तात्रय कडू पाटील, देवळाली प्रवरा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष केदारनाथ चव्हाण, देवळाली प्रवरा शहर शिवसेना पक्षाचे अध्यक्ष सुनीलभाऊ कराळे, राहुरी साखर कारखान्याचे माजी संचालक कारभारी डौले, माजी संचालक अरुण कोंडीराम ढुस, साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे, राहुरी अर्बन पतसंस्थेचे चेअरमन रामभाऊ काळे, योग प्रशिक्षक किशोर थोरात, धनलक्ष्मी उद्योग समूहाचे विष्णुपंत गीते, देवळाली प्रवरा सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब मुसमाडे, देवळाली प्रवरा सोसायटीच्या माजी संचालिका चांगुणाबाई ढुस, देवळाली प्रवरा ओम शांती केंद्राच्या संचालिका विजया बहेनजी, राहुरी अर्बन च्या संचालिका नंदा ढुस, चैताली इलेक्ट्रिकल चे भाऊसाहेब मुळे, गुरुकृपा ट्रेडर्सचे किशोर कलंगडे, कॉन्ट्रॅक्टर बाळासाहेब ढुस, कानिफनाथ इंजिनिअरिंगचे सोपान सौदागर, प्रा. बाळासाहेब मुसमाडे, देवळाली प्रवरा दत्त देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष अरुण ढुस, आयुर्वेद निष्णात मारुती मोरे आदींसह अनेक मान्यवरांनी कार्यक्रम प्रसंगी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी बोलताना अनुराधाताई आदिक म्हणाल्या की, या मेडिकल व सुपर शॉपी मुळे श्रीरामपूर शहरातील नागरिकांना विशेष लाभ मिळणार आहे. कोरोना मुळे नागरिकांना आजही घराबाहेर पडण्यास बंधने असल्याने या मेडिकलच्या २४ तास घर पोहच सेवेने येथील नागरिकांना थोडा दिलासा मिळण्यास मदत होणार आहे. अश्या सेवेची आज नागरिकांना गरज असतांना ती ओळखुन प्रवरा मेडिकलने ही सेवा उपलब्ध करून दिल्याने श्रीरामपूरच्या वैभवात त्यामुळे नक्कीच भर पडण्यास मदतच झाली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी केले.