अहिल्यानगर
क्रांतीसेनेच्या विद्यार्थी जिल्हाध्यक्षपदी निबे, युवक तालुकाध्यक्षपदी भोसले
कोल्हार: येथील ऋषीकेश बाळासाहेब निबे यांची अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या उत्तर नगर विद्यार्थी जिल्हाध्यक्षपदी व अंकुश भोसले यांची राहाता युवक तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली.अखिल भारतीय क्रांतीसेनेचे राज्य संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील व पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष गोरक्षनाथ माळवदे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी विजय माधवराव निबे,अनिता विजय निबे,नयन खर्डे पाटील,संतोष जवक,विशाल काकडे,जयश खोसे,गणेश गायकवाड,सचिन विधाते,गणेश जाधव,असिफ शेख आदी उपस्थित होते.
या निवडीचे अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या मार्गदर्शिका माजी मंत्री शालिनीताई पाटील,पक्षप्रमुख संतोष तांबे पाटील,प्रदेश सरचिटणीस नितीनभैय्या देशमुख,शिक्षक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भागचंद औताडे,अरूण थोरात, पश्चिम महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख बाबासाहेब चेडे,रंगनाथ माने,शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुभाष चाटे,पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष संदीप ओहोळ,संघटक जालिंदर शेडगे, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष नवनाथ ढगे,दक्षिण नगर जिल्हाध्यक्ष सुभाष दरेकर,उत्तर युवक जिल्हाध्यक्ष युवराज सातपुते, दक्षिण नगर युवक जिल्हाध्यक्ष शब्बीर शेख आदींनी अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.ऋषीकेश निबे व अंकुश भोसले यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.