अहिल्यानगर

सैनिक हा देशाचा अभिमान -आ. संग्राम जगताप

जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनच्या वतीने शूरवीरांना अभिवादन
अहमदनगर – जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनच्या वतीने तपोवन रोड येथील शहीद स्मारकाच्या नियोजित जागेत माजी सैनिकांनी कारगिल विजय दिवस साजरा केला. वंदे मातरम…, भारत मातेच्या जय घोषाने… या लढ्यातील शूरवीरांना अभिवादन करण्यात आले.
भारत-पाकिस्तानमध्ये 1999 मध्ये झालेल्या कारगिल लढ्यात शहिद झालेल्या भारत मातेच्या जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली. शहिदांच्या प्रतिमांसमोर आमदार संग्राम जगताप, युवा नेते अक्षय कर्डिले, सुरेंद्र गांधी, नगरसेवक निखिल वारे, सुनील त्रिंबके, वन विभागाचे अधिकारी डी.आर. जिरे, ह.भ.प. राम महाराज घुले, बुर्‍हाणनगरचे सरपंच रावसाहेब कर्डिले, निवृत्त कर्नल डॉ. सर्जेराव नागरे, एकता एज्युकेशनचे नूर मोहम्मद पठाण, सामाजिक कार्यकर्ते जयवंतराव मोटे यांच्या हस्ते पुष्पचक्र वाहण्यात आले.
यावेळी समीर पठाण, रघुनाथ औटी, आदिशक्ती महिला फाउंडेशनच्या जयाताई पालवे, ज्योती भांड, जय हिंद फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे, बाळासाहेब नरसाळे, शिवाजी पठाडे, महादेव झिरपे, गोरक्षनाथ पालवे, कैलास दोरंगे, रामचंद्र टकले, विठ्ठल लगड, संजय पाटेकर, भाऊसाहेब देशमाने, दिगंबर झिने, एकनाथराव माने, कारभारी भांड, भाऊसाहेब दुसंगे, सुनील तारडे, रोहिदास पालवे, प्रवीण आव्हाड, वसंत कांबळे, अंकुश भोस, अण्णा दिघे, बळवंत पालवे, राजेंद्र भागवत, दुशांत घुले, शिवाजी खाडे, शरद हरिश्‍चंद्रे, मिनीनाथ निकरड, अनिल लगड, बचत गटाच्या अनिताताई नेटके, उपसरपंच जालिंदर जाधव, चेअरमन रबाजी कर्डिले, रंगनाथ कर्डिले, श्रीधर पानसरे, गुलाब शेख, आरिफ शेख, साळवे मेजर, भैरवनाथ नेटके, जालिंदर दरेकर, निळकंठ उल्हारे नंदकिशोर विधाते, अर्जुन चौरे, संतोष चौरे, भुजबळ मेजर, महादेव शिरसाठ, अमोल निमसे, अलका पालवे, जगतापताई आदी उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, सैनिक हा देशाचा अभिमान आहे. सैनिक बजावत असलेल्या कर्तव्यामुळे देशातील नागरिक सुरक्षित असून, त्यांच्या उपकाराची परतफेड करणे अशक्य आहे. कारगिलमध्ये 527 सैनिकांनी बलिदान दिले. तर तेराशे जवान जखमी झाले होते. त्यांच्या या बलिदान व योगदानाने कारगिलचा विजय मिळाला. देशातील प्रत्येक नागरिकांनी आजी-माजी सैनिकांबद्दल कृतज्ञता ठेवावी. देश रक्षणाचे कार्य करुन फाऊंडेशनच्या माध्यमातून जिल्हाभर सुरु असलेली वृक्षरोपण चळवळ प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
अक्षय कर्डिले यांनी कारगिल लढ्यातील शहिदांना नमन असल्याचे सांगून, माजी सैनिक समाजात देत असलेले योगदान कौतुकास्पद असल्याचे स्पष्ट केले. सुरेंद्र गांधी म्हणाले की, देश सेवेनंतर जनतेची सेवा करण्याचे काम माजी सैनिक करत आहे. देशसेवेने भारावलेले माजी सैनिकांच्या सामाजिक योगदानाने बदल घडणार असल्याचे त्यांनी सांगितले. फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे म्हणाले की, सैनिक म्हणजे संघर्ष आणि संघर्षातून विजय मिळवणे हेच सैनिकाचे ध्येय असते. देशांमध्ये कुठल्याही बलाढ्य संकटाला तोंड देण्याचे काम सैनिक करत असतात. महापूर असेल किंवा एखाद्या मोठी दुर्घटना असेल त्या ठिकाणी सैनिक तत्परतेने काम करतात. देश रक्षणाची असलेली भावना, देशाप्रती असलेला सन्मान व देशातील जनते प्रती असलेला प्रेम कायम असतो. तिरंगा ध्वज हीच सैनिकाची खरी भक्ती व शक्ती असल्याचे त्यांनी सांगून, कारगिलच्या लढाईबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमासाठी नागरिकांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. आभार निळकंठ उल्हारे  यांनी मानले.

Related Articles

Back to top button