शिक्षणवारी ज्ञान पंढरी
स.भु.बिडकीनमध्ये माता पालक संघाची स्थापना
विलास लाटे | पैठण : तालुक्यातील बिडकीन येथील सरस्वती भुवन प्रशालेत माता पालक संघाची स्थापना करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रशालेचे मुख्याध्यापक मनोहर चित्तोडकर, प्रमुख वक्त्या म्हणून मंगला गायधने व्यासपीठावर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात येऊन पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी उपस्थित माता पालक यांच्या मधून कार्यकारिणी निवडण्यात करण्यात आली. माता पालक संघाचे अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक मनोहर चित्तोडकर, उपाध्यक्ष नूतन सोनटक्के, सचिव एस. आर. तोष्णीवाल, सहसचिव आर. डी. चिलवार यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.आर.तोष्णीवाल यांनी तर आभार आर.डी.चिलवार यांनी मानले. या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात माता पालक उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.