शिक्षणवारी ज्ञान पंढरी
राज्यस्तरीय अबॅकस परिक्षेत अवनी सलालकर प्रथम
श्रीरामपूर – निशा अबॅकस ( ABACUS ) या संस्थेने सोलापूर येथे राज्यस्तरीय परीक्षेचे आयोजन केले होते. अवनी सलालकर हिने चौथ्या टप्प्यातील पहिल्या पेपरमध्ये प्रथम क्रमांक पटकावला तर दुसरा पेपरमध्ये तृतीय क्रमांक पटकावला. तिच्या यशाबद्दल एस.के. सोमैया प्राथमिक विद्यामंदिर श्रीरामपूर शाळेच्या संचालिका तथा रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्या मिनाताई जगधने, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सोनालीताई पैठणे, वर्ग शिक्षिका श्रीमती मेघा पवार, श्रीमती अनिता चेडे, श्री.भालदंड सर आदिंनी अभिनंदन केले. सौ.संचिता नरोटे यांनी मार्गदर्शन केले. अवनी सलालकर हिच्या यशाबद्दल महंत बापू कुलकर्णी, नवनाथ अकोलकर, शिवराज तिटमे, ज्ञानेश्वर पटारे, चंद्रकांत कराळे, माधवराव तिटमे, श्रीकांत किर्तीशाही आदिंनी अभिनंदन केले.