धार्मिक

१४ व १५ सप्टेंबर रोजी हरिगाव मतमाउली ७६ वा यात्रा महोत्सव

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : देशात प्रख्यात असलेली श्रीरामपूर तालुक्यातील संत तेरेजा चर्च हरिगाव येथील मतमाउली यात्रेच्या ७६ व्या यात्रा महोत्सवाचा शुभारंभ दि ४ सप्टेंबर रोजी नासिक धर्मप्रांत सेवानिवृत्त महागुरू स्वामी लूरडस डानियल यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहणाने संपन्न झाला. या पूर्वी नऊ शनिवार नोव्हेना भक्ती झाली. दि. ५ सप्टेंबर पासून यात्रेपर्यंत रोज सायंकाळी नोव्हेना होत आहे.

शनिवार, दि. १४ सप्टेंबर रोजी मतमाउली यात्रा ७६ वा महोत्सव साजरा होईल. त्यावेळी सकाळी ८.३० वा.पवित्र जपमाळ, नोव्हेना व विधिवत प.मारिया मूर्तीच्या शिरावर मुकुट चढविला जाईल व दर्शन रांगेने प्रारंभ होईल. सायंकाळी ४.३० वाजता महागुरुस्वामी रा रे डॉ बार्थोल बरेटो यांचे मुख्य प्रवचन, यात्रा सांगता प्रसंगी दि. १५ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० वा. रेक्टर पुणे फा.भाऊसाहेब संसारे यांचे प्रवचन होईल. सर्व कार्यक्रमात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन प्रमुख धर्मगुरू डॉमनिक रोझारिओ व सहकारी धर्मगुरू यांनी केले आहे. दि १५ सप्टेंबर पासून राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा होतील.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button