अहमदनगर

कळी उमलताना ‘शिबिरात विद्यानिकेतन अकॅडमीच्या विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : १६ जून रोजी ॲड. रावसाहेब शिंदे प्रतिष्ठान संचलित विद्यानिकेतन अकॅडमीच्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच कटिबद्ध असणाऱ्या विद्यानिकेतन संकुलाच्या व्हाईस चेअरपर्सन डॉ. प्रेरणा शिंदे यांच्या संकल्पनेतून शिर्डी येथील पंचतारांकित हॉटेल मध्ये आयोजित आर्ट २० समिट २४ या परिषदेत ‘कळी उमलतांना’ या विषयावर शिबिरात विद्यानिकेतन अकॅडमीच्या विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

पौगांडवस्था व पौगांडवस्थेत होणारे शरिरिक, मानासिक बदल, आरोग्य विषयक स्वच्छता तसेच समतोल आहार याविषयी कार्यशाळेत भारतातील विविध ठिकाणांवरून आलेल्या नामांकित डॉक्टर सहभागी झाले होते. यावेळी डॉ. प्रेरणा शिंदे यांनी मुली जन्मताच मुलांच्या तुलनेत कशा कणखर व सक्षम आहेत. तसेच प्रत्येक मुलींना आपण मुलगी असल्याचा अभिमान असायला हवा, सन्मान स्त्रीशक्तीचा याविषयी मार्गदर्शन केले. रिक्षा ड्रायव्हर पासून पायलट पर्यंत सर्वच क्षेत्रात मुली अग्रस्थानी आहेत म्हणून मुलींनी स्वतःला कमी समजू नये असे उद्गार नागपूर येथील सुप्रसिद्ध डॉ.चैतन्य शेभेकर यांनी काढले. डॉ. निलम बॅसी यांनी ९ ते १० वर्षे या वयातील मुलांना एचपीव्ही लसीकरण देऊन आपण कर्करोगासारख्या असाध्य रोगावर मात करू शकतो याविषयी जागृती केली. डॉ. कविता दरडे यांनी मुलींची अत्याधुनिक जीवनशैली व स्क्रीन टाइम पासून स्वतःला दूर कसे ठेवायचे याविषयी जाणीव पूर्वक मार्गदर्शन केले.

अतिशय माहितीपुरक परिषदे नंतर विद्यार्थिनींनी अतिशय चिकित्सक प्रश्न विचारले. त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देतांना विद्यार्थीनीच्या चिकित्सक वृतीचे सर्वच डॉक्टरांनी कौतुक केले. विद्यानिकेतन अकॅडमीची विद्यार्थीनी प्रमुख कु. विधी कोठारी हिने सर्व विद्यार्थीनीच्या वतीने सर्व डॉक्टरांबरोबर डॉ. प्रेरणा शिंदे व डॉ. राजीव शिंदे यांचे विशेष आभार मानले. या परिषदेसाठी संस्थेचे चेअरमन टी.ई. शेळके, व्हा. चेअरपर्सन डॉ. प्रेरणा शिंदे, खजिनदार डॉ. राजीव शिंदे, प्राचार्या रंजना जरे, उपप्राचार्या वर्षा धामोरे, समन्वयक अमित त्रिभुवन, सर्व शिक्षक व शिक्षिकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button