अहिल्यानगर
भूमी फाउंडेशन सामाजिक संस्थेकडून अत्यंत गरज असणार्या घटनास्थळी मदत
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील नायगाव येथील श्रीमती नंदाबाई बाळासाहेब गायकवाड या आदिवासी महिलेचे पती, मुलगा, मुलगी तिघांचेही २५ दिवसांपूर्वी श्रीरामपूर परिसरात अपघातात निधन झाले.
या घटनेने आज या निराधार महिलेला कोणताही आधार उरलेला नाही. या गंभीर स्वरूपाच्या घटनेची तातडीने दखल घेत भुमी फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष कैलास पवार व पदाधिकार्यांनी आज धनादेश/ चेक स्वरूपात सदर महिलेला मदत केली. पुढेही या महिलेला मदत करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन यावेळी संस्थापक अध्यक्ष कैलास पवार यांनी दिले.
याप्रसंगी देखील समाजातील दानशूर व्यक्तींना देखील कैलास पवार यांनी आव्हान केले आहे की, या महिले करिता आपणास जमेल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करावा. याप्रसंगी उपस्थित नायगावचे सरपंच, ग्रामस्थ, प्राध्यापक डॉ बाबुराव उपाध्य, प्रा शिवाजीराव बारगळ आरोग्य मित्र भीमराज बागुल, व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.