अहिल्यानगर
‘शब्दगंध’ च्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कथा व काव्य लेखन स्पर्धेचे आयोजन
राहुरी | बाळकृष्ण भोसले – शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय कथा व काव्य लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असुन पारितोषिक प्राप्त नवोदित विद्यार्थी साहित्यिकांस रू ३०००, रू.२००० व रु.१००० ची पुस्तके भेट देण्यात येणार आहेत, अशी माहिती शब्दगंध चे संस्थापक, सचिव सुनील गोसावी यांनी दिली.
शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची आवड निर्माण व्हावी यासाठी विविध साहित्यिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क नाही. या स्पर्धेमध्ये आर्ट्स, कॉमर्स, सायन्स,नर्सिंग, मेडिकल, इंजिनिअरिंग, कृषी तसेच सर्व पदवी व पदवीतर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी सहभागी होऊ शकणार आहेत.
पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना अनुक्रमे रु.३०००, रु.२००० व रु.१००० ची पुस्तके, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व उत्तेजनार्थ पाच स्पर्धकांना रुपये पाचशे ची पुस्तके व प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. स्पर्धकांनी आपल्या स्वरचित अप्रकाशित दोन कविता किंवा स्वलिखित व अप्रकाशित कथा दि. २० सप्टेंबर २०२२ पर्यंत शब्दगंध – फुलोरा, लक्ष्मी कॉलनी, भिस्तबाग महाजवळ, तपोवन रोड, सावेडी, अहमदनगर- ४१४००३. मोबाईल क्रमांक ९९२१००९७५० येथे पाठवावे.
आपल्या साहित्या सोबत कॉलेजचे आयडेंटीकार्ड झेरॉक्स, स्वतःचा परिचय व पोस्टाची रुपये पाच ची पाच तिकिटे पाठवावीत, असे आवाहन शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, कार्याध्यक्ष प्रा.डॉ.अशोक कानडे, कार्यवाह सुभाष सोनवणे, भगवान राऊत, राजेंद्र फंड, शर्मिला गोसावी, प्रा.डॉ. तुकाराम गोंदकर, बबनराव गिरी, स्वाती ठूबे, प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे, ज्ञानदेव पांडुळे, सुनीलकुमार धस, अजयकुमार पवार व किशोर डोंगरे यांनी केले आहे.