शिरसगाव येथे हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात साजरा
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : शिरसगाव ग्रामपंचायतीच्या वतीने महिलांसाठी आयोजित हळदी कुंकू कार्यक्रम विठ्ठल मंदिर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी “खेळ पैठणीचा, खेळ परपंराचा” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी विशेष पारितोषिके देण्यात आली. हा होम मिनिस्टर कार्यक्रम पहिल्यांदाच गावात गौरवास्पद झाल्याची भावना सर्व महिलांनी व्यक्त केली. स्पर्धेत उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांना बक्षिस देण्यात आली. प्रथम बक्षिस पैठणी सौ. राणी गवारे, दुसरी पैठणी सौ. निकिता यादव, तिसरे सौ. सुनिता ताके यांना देण्यात आली, चौथे सरस्वती यादव, पाचवे सौ. प्रिया सातदिवे, सहावे सौ. भाग्यवंत असे मानकरी ठरले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वश्री गावच्या सरपंच सौ. राणीताई वाघमारे, उपसरपंच संजय यादव, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, कर्मचारी व गणेशराव मुदगुले मित्र मंडळ कार्यरत होते.