ठळक बातम्या
सावित्रीबाई फुलेंचा स्मृतीदिन चुकीच्या तारखेला छापणार्या अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी
नगर – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या २०२३ च्या अधिकृत दिनदर्शिकेतील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतीदिन चुकीच्या तारखेला छापलेला आहे. तरी सदर चुक करणार्या अधिकार्यांवर कडक कारवाई करावी, त्यांनी जाहिर माफी मागावी व हि दिनदर्शिका ताबडतोब मागे घ्यावी, अशा आशयाचे पत्र नुकतेच श्री संत सावता माळी युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भूषन लोकनेते सचिन भाऊसाहेब गुलदगड यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुंना पाठवले आहे.
सावित्रीबाई फुले यांच्या नावाने जे विद्यापीठ चालते त्या ज्ञानजोती सावित्रीबाई यांची मृत्यूची तारीख 10 मार्च 1897 असताना विद्यापीठाच्या अधिकृत कॅलेंडरमध्ये ती 3 मार्च दाखवण्यात आली आहे. ही मोठी चूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी व त्यांनी जाहीर माफी मागावी तसेच हे कॅलेंडर ताबडतोब मागे घ्यावे. अन्यथा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर श्री संत सावता माळी युवक संघाकडून धडक मोर्चा काढुन कुलगुरुना घेराव घालण्यात येईल, असा इशारा श्री संत सावता माळी युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भूषन लोकनेते सचिन भाऊसाहेब गुलदगड यांनी दिला आहे.