अहिल्यानगर

समर्पित व्यक्तीमुळेच भविष्याला आकार मिळतो- प्रा. डॉ. गागरे

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : समाजाची प्रगती ही सेवाभावी व्यक्तीमुळे होते. सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात हे अस्सल सेवाभावी व्यक्तिमत्व होते. राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद अशा समर्पित व्यक्तींमुळेच भविष्याला आकार मिळतो, असे विचार माजी प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे यांनी व्यक्त केले.

श्रीरामपूर येथील ॲड. रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानच्या विद्यानिकेतन शैक्षाणिक संकुलातर्फे सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. प्रारंभी जिजाऊ माँसाहेब, स्वामी विवेकानंद आणि स्व. भाऊसाहेब थोरात यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे चेअरमन माजी प्राचार्य टी. ई. शेळके होते. साहित्यिक डॉ.बाबुराव उपाध्ये, प्रा शिवाजीराव बारगळ यांची प्रमुख उपस्थिती होती. सौ रंजनाताई जरे व योगेश गायकवाड यांनी पाहुण्यांचे सत्कार केले.

डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी माणूसच माणसांचे जीवन घडवितो त्यामुळे त्यांचे स्मरण म्हणजे समर्पित सेवेला नमन आहे. प्राचार्य डॉ. गागरे यांनी भाऊसाहेब थोरात, डॉ. अण्णासाहेब शिंदे, ॲड. रावसाहेब शिंदे, ॲड. पी.बी. कडू पाटील यांच्या देशसेवेचे महत्व आणि आठवणी सांगितल्या. प्रा. शेळके यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सांगितले की, रावसाहेब शिंदे प्रतिष्ठान हे केवळ भाऊसाहेब थोरात यांच्यामुळे स्थापन झाले, ते प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष होते आणि त्यांचे योगदान मोठे आहे. रावसाहेब शिंदे यांना आपल्या नावाने प्रतिष्ठान व्हावे अशी कधीच भूमिका नव्हती परंतु भाऊसाहेब थोरात यांनी कुणालाच न विचारता विद्यानिकेतन शाळेच्या प्रवेशाची जाहिरात दिली आणि हे शैक्षणिक संकुल उभे राहिले, याविषयी आठवणी सांगितल्या. भारती कुदळे आणि शिक्षकांनी नियोजन केले. सूत्रसंचालन सतिश थोरात यांनी तर सौ.दीपाली निकम यांनी आभार मानले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button