संजय गांधी निराधार योजनेच्या संगमनेर तालुकाध्यक्षपदी अमोल खताळ
संगमनेर | बाळासाहेब भोर : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभाग अंतर्गत येणाऱ्या संजय गांधी निराधार योजनेच्या संगमनेर तालुका अध्यक्षपदी नुकतीच युवा सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ यांची निवड करण्यात आली आहे.
अंध, अपंग, विधवा स्त्रिया, अनाथ बालके इत्यादी निराधार लोकांसाठी ही योजना तयार करण्यात आली असून आधी या योजनेसाठी शासनाकडून दरमहा 1000 रुपये इतके अनुदान प्राप्त होत असे परंतु आताच्या युती सरकारने या रकमेत वाढ करून दरमहा 1500 रुपये थेट लाभार्थ्याच्या खात्यात जमा होत आहे. नगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूलमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्री खताळ यांच्यावर विश्वास दाखवून त्यांची या समितीच्या अध्यक्षपदी निवड केली आहे.
अमोल खताळ पूर्वाश्रमीचे सामाजिक कार्यकर्ते आहेत.या आधीही श्री खताळ यांनी जनसामान्यांची अनेक रखडलेली कामे मार्गे लावली आहेत. कोणत्याही वेळी जनसामान्यांच्या मदतीला धावून जाणारा युवा सामाजिक कार्यकर्ता असा त्यांनी तालुक्यात नावलौकिक मिळवलेला आहे. निष्क्रिय व्यवस्थेला कायदेशीर मार्गाने घाम फोडणाऱ्या अभ्यासू व्यक्तिमत्वाची शासकीय समितीवर नियुक्ती झाल्याने तालुका भरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
“अमोल खताळ यांच्यासारख्या सामाजिक कार्याची जाण असणाऱ्या संवेदनशील व्यक्तीकडे या समितीचे अध्यक्ष पद आल्याने तालुक्यातील कोणताही निराधार आता सरकारी योजनांपासून वंचित राहणार नाही याची शाश्वती निर्माण झाली आहे”.
योगेश डुबे, उपाध्यक्ष, भाजपा युवा मोर्चा, संगमनेर