देवळाली प्रवरा जिल्हा परिषद प्राथमिक सेमी इंग्रजी शाळेत महापरिनिर्वाण दिन साजरा
देवळाली प्रवरा : येथिल जिल्हा परीषद प्राथमिक सेमी इंग्रजी शाळेत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना ६७ व्या महापरिनिर्वाण दिना निमित्ताने अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस शालेय विद्यार्थी समर्थ सोमनाथ कासोळे व रुद्र रंगनाथ डुक्रे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना शाळेतील शिक्षिका मिनाश्री तुपे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेमुळे भारताने जगाला आदर्शवत ठरेल अशी लोकशाही प्रस्थापित केलेली आहे. त्यांनी दिलेल्या सर्वसमावेशक संविधानामुळेच दीन-दलित, कष्टकरी, शोषित, वंचित समाजाला स्वाभिमानाने जगण्याचा हक्क मिळाला असे सांगितले.
यावेळी इयत्ता चौथी मधील विद्यार्थी समर्थ सोमनाथ कासोळे व रुद्र रंगनाथ डुक्रे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र उंडे, अर्जुन तुपे, भारती पेरणे, सुभाष अंगारखे, स्वाती पालवे, मिनाषी तुपे, शिवाजी जाधव, सुप्रिया आंबेकर, सुनिता मुरकुटे, वनिता तनपुरे, लक्ष्मी ऐटाळे, जकिया इनामदार, हसन शेख आदी उपस्थित होते.