शिक्षणवारी ज्ञान पंढरी
लोणी येथे पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी
लोणी – राहाता तालुक्यातील लोणी येथील रयत शिक्षण संस्थेच्या रयत शैक्षणिक संकुल व कनिष्ठ महाविद्यालय येथे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 135 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आ. डॉ. सुधीर तांबे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांनी वाड्या वस्त्यांवर बहुजनांच्या झोपडी पर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवली. या स्पर्धेच्या युगात विविध स्पर्धा परीक्षेत रयत शिक्षण संस्थेचा वाढता आलेख ही अभिमानाची बाब आहे. रयतचा विद्यार्थी विविध कला, क्रीडा क्षेत्रात घेत असलेली भरारी अभिमानास्पद आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रेरणेने कर्मवीर शंकररावजी काळे, कॉ. कडू पाटील तसेच देशाचे सर्वोच्च नेते शरदचंद्रजी पवार साहेब कर्मवीरांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून तन-मन-धनाने रयत शिक्षण संस्थेच्या भरभराटीसाठी प्रामाणिक प्रयत्न करीत आहे.
कार्यक्रमात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील बोलले की, रयत शैक्षणिक संकुल लोणी हे विविध स्पर्धा परीक्षेत राज्यात, जिल्ह्यात तसेच संपूर्ण संस्थेत आदर्श व गुणवंत विद्यालय ठरते आहे. नवनवीन क्षेत्रात पादक्रांत करण्यासाठी विद्यार्थ्यांनी विज्ञानाची कास धरली पाहिजे. कर्मवीर भाऊराव यांचे एकात्मतेचे आणि स्वावलंबनाचे कार्य देशाला मार्गदर्शक आहे. आज समाज जागा झालाय, प्रबोधन वेगाने होतंय म्हणून आज कर्मवीरांपुढे नतमस्तक होऊन त्यांचा आदर्श पुढे न्यायला हवा. यावेळी विविध मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. विविध पारितोषिकांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
कार्यक्रमास जनरल बॉडी सदस्य एकनाथराव घोगरे, स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष बाळासाहेब केरूनाथ विखे, लोणी खुर्द ग्रामपंचायतचे सरपंच जनार्दन घोगरे, जिल्हा काँग्रेस चे सरचिटणीस श्रीकांत मापारी, लोणी खुर्द सेवा संस्थेचे चेअरमन राजेंद्र आहेर, ग्रा.प. सदस्य विलास घोगरे, रनजित आहेर, दिपक घोगरे, आशोक आहेर, सुभाष आहेर, चांगदेव गावकरी, नितीन दिघे यांच्यासह रयत संकुल लोणी येथे सेवा केलेले सेवानिवृत्त शिक्षक, सेवक यांच्यासह पालक, विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी उपस्थित होते.